पान:सभाशास्त्र.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक सभातंत्र ती उधळून लावण्याचा आधिकार नाहीं, सभेला परवानगी घेतली नाहीं; अगर सभेची खबर पोलिसांना दिली नाहीं तर जे सभाचालक असतील त्यांचे विरुद्ध खटले करणे हा योग्य मार्ग आहे व याप्रमाणे सामान्यतः होते. सभाबंदी नाहीं, पण सभा भरली असून गैरकायदा ठरविलेल्या संस्थेचा प्रचार होत आहे, याहीवेळीं भाषण करणारांवर खटले करणे हाच कायदेशीर मार्ग आहे. शांत सभेत आक्षेपार्ह भाषणे केली तर त्याबद्दलही खटले करणे हाच मार्ग आहे. सभाबंदी केली असतां सभा भरविण्यात आली तर ती गैरकायदा जमाव होतो व ती उधळून लावण्याचा पोलिसांना अधिकार आहे. गैरकायदा जमाव असला अगर झाला तर तो उधळून लावतांना पोलिसांनी कसे वर्तन करावें याविषयीं कांहीं नियम आहेत. इंग्लंडमध्ये १२ अगर त्यापेक्षा अधिक माणसांचा जमाव दंगल करूं लागला म्हणजे मॅजिस्ट्रेट गर्दीचे कायद्याप्रमाणे (Riot Act ) घोषणा करून जमावाला निघून जाण्यास सांगतो व त्याप्रमाणे लोक न वागल्यास त्यांना पकडण्यात येते. अगर त्यांचेवर गोळीबार करण्यांत येतो. वरीलप्रमाणे घोषणा केलीच पाहिजे असे नाहीं. योग्य प्रसंग ती न करतां गोळीबार करण्याचा हक्क आहे. निरनिराळ्या पोलीस कायद्याखालीं शांततासंरक्षणासाठी जरूर ते नियम करण्याचा आधकार पोलिस कमिशनर व जिल्हा पोलिस अधकारी यांना दिलेला आहे. शांतताभंग होत असेल अगर होण्याचा संभव असेल तर सभेची जागा तात्पुरती ताब्यात घेण्याचा अधिकारही नियमान्वये पोलिसांना दिलेला आहे. गैरकायदा जमाव हटावण्याचा व जागा ताब्यात घेण्याचा अधिकार उपयोगांत आणतांना पोल. सांना जरूर वाटल्यास लष्कराची मदत घेण्याचा अधिकार आहे. सामान्यतः गैरकायदा जमाव झाला असेल तर मजिस्ट्रेट अगर पोलीस अधिकारी जमावाला निघून जाण्यास सूचना देतात व त्याप्रमाणे लोक निघून न गेले तर, अगर सूचना देण्यापूर्वी जमावाचे वर्तनावरून तो दूर होणार नाहीं, निघून जाणार नाही असे वाटत असेल तर, मॅजिस्ट्रेटनें अगर पोलीस अधिका-याने शक्तीचा उपयोग करून ( Use of force ) जमाव उधळून लावावा व जरूर तर त्यांतील लोकांना पकडावे व त्यांवर खटले करावेत. ( बाँबे पोलीस अॅक्ट, कलम ४० ) जर पोलीसची मदत पुरेशी नाही असे वाटेल तर पोलीस कामशनर अगर हजर असलेला मॅजिस्ट्रेट यांना लष्कर अगर नाविक दलाची मदत, दंगा अगर शांतताभंग थांबविण्यासाठी मागविता येते. (कलम ४१ )।