पान:सभाशास्त्र.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९३ पुणे शहर म्युनिसिपालिटीने केलेले नियम परवानगीशिवाय दुसरे कोणत्याही सभासदास फक्त त्या सूचनेविषयीं कांहीं गैरसमज झाला असल्यास तो दूर करण्याच्या कारणाशिवाय एकापेक्षा अधिक वेळां एकाच सूचनेवर किंवा उपसूचनेवर बोलतां येणार नाही. मात्र एखाद्या सूचनेविषयी सभेत एखादा सभासद पूर्वीच बोलला असेल व उपसूचनेवर जर एखादी उपसूचना आली असेल तर त्या उपसूचनेमुळे ज्या कांहीं नवीन गोष्टींचे प्रतिपादन करण्यांत आले असेल त्याच नवीन गोष्टींपुरते सदर सभासदास पुन्हा बोलण्यास हरकत नाहीं. २९. कांहीं विशिष्ट परिस्थितीत भाषण करू इच्छिणाच्या सभासदांनी कोणत्या अनुक्रमाने भाषण करावे :–एकाच वेळी एकापेक्षा अधिक सभासद सभेपुढे भाषण करण्यास उभे राहिल्यास अध्यक्ष स्वतः, चर्चा न होऊ देतां सदर सभासदांनी भाषणे कोणत्या क्रमाने करावीत हे ठरवितील व त्यांनी दिलेला निकाल अखेरचा समजावा. ३०. भाषण करणाच्या सभासदाने आपल्या जागी पुन्हा केव्हां बसावेंः–सभासदाचे बोलणे पुरे होतांच त्याने खालीं बसावें. सभेत एक सभासद बोलत असतांना दुसन्या सभासदाने पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केल्याशिवाय बोलू नये. सभागृहास उद्देशून अध्यक्ष यांना कांहीं सांगावयाचे असल्यास सभा चालू असतांना याप्रमाणे केव्हाही बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. भाषण करीत असलेल्या सभासदाने अध्यक्ष यांचे बोलणें संपेपर्यंत ताबडतोब खाली बसावे, ३१. तहकुबीची सूचनाः—सभेचे काम तहकूब ठेवण्याबद्दलची सूचना अथवा एखाद्या प्रश्नाचा विचार तहकूब ठेवण्याविषयीची सूचना आल्यास सदरील सूचनेचा विचार सभेपुढील दुस-या कोणत्याही सूचनेच्या अगोदर केला जाईल, ( १ ) मात्र एखाद्या प्रश्नावरील वादविवाद संपला असल्यास त्या प्रश्नाचा विचार तहकूब ठेवण्याविषयींची सूचना आणता येणार नाहीं अगर असा प्रश्न निकालात निघेपर्यंत सभातहकुबीची सूचना मांडता येणार नाही, (२) तसेच एखाद्या प्रश्नाचा विचार बिनमुदत तहकूब ठेवल्यास तो एक महिन्यापेक्षा जास्त मुदतीपर्यंत तहकूब ठेवण्यात आला नाहीं असे समजण्यांत येईल व असा प्रश्न तहकूब केल्या तारखेपासून एक महिन्यानंतर