पान:सभाशास्त्र.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २९२ • • •••....................... अनुमोदन मिळाल्यावर अध्यक्षांच्या परवानगीखेरीज ती परत घेण्याचा अगर तिच्यांत महत्त्वाचा फेरफार करण्याचा अधिकार सूचना आणणारास नाहीं. । २५. सूचनाः-(१) एखादी सूचना पुढे मांडल्यावर व तिला अनुमोदन देण्यांत आल्यावर दुस-या कोणत्याही सभासदाने त्या बाबतीत उपसूचना पुढे आणावी. (२) प्रत्येक उपसूचना ही सूचनेतील विषयास धरून असली पाहिजे व मूळ सूचनेत फेरफार करण्याबाबत अथवा तिच्यांत कांहीं अधिक मजकूर सुचविण्याबाबत अगर तिच्यांतील कांहीं भाग गाळून टाकण्याबाबत असावी. परंतु कोणतीही उपसूचना ही सभेपुढे असलेल्या सूचनेच्या अगदी विरुद्ध, निषेधात्मक नसावी, अथवा त्याच सभेमध्ये जी एखादी सूचना अगर उपसूचना नामंजूर करण्यांत आली असेल तशा अर्थाची नसावी. मात्र एखादी निषेधात्मक सूचना अगर उपसूचना सभेपुढे आल्यास त्याचे विरुद्ध उपसूचना मांडता येईल. (३) सभेपुढे एकाच वेळी वाटेल तितक्या उपसूचना आणतां येतील, परंतु कोणत्याही सभासदास एका सुचनेचेचाबतींत एकाहून अधिक उपसूचना आणण्याचा हक्क नाही. ज्या कोणा सभासदाने सूचना सभेपुढे मांडली असेल त्यास सदर सूचनेस उपसूचना देता येणार नाहीं. ३६. उत्तर देण्यास सुरुवात झाल्यानंतर उपसूचना देता येणार नाहींः–सभासदाने सूचनेवर उत्तर देण्यास आरंभ केल्यानंतर सदरचे सूचनेवर उपसूचना देता येणार नाही. २७. पॉइंट ऑफ ऑर्डर काढल्याशिवाय सभागृहांत बोलण्याचा अगर मध्येच अडथळा करण्याचा अधिकार नाहींःसभासदांनी आपआपसांत बोलून सभेच्या कामांत व्यत्यय आणू नये; तसेच * पॉइंट ऑफ ऑर्डर' काढल्याशिवाय मध्येच सभासदाचे भाषणांत अडथळा करू नये, २८, भाषण करण्याचा व उत्तर देण्याचा हक्क ः–ठरावावरील चर्चा संपल्यावर ज्या सभासदाने ठरावास शेवटीं उपसुचना दिली असेल त्याने प्रथम, नंतर त्या उपसूचनेच्या आधीं उपसूचना मांडणाच्या सभासदांनीं, व शेवटी ठराव मांडणान्याने उत्तर द्यावे. अध्यक्ष यांचे खास