पान:सभाशास्त्र.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९१ पुणे शहर म्युनिसिपालिटीने केलेले नियम २०. अनुमोदन देणेः–अध्यक्षांच्याकडून मांडल्या जाणाच्या सूचना अगर उपसूचना, ज्यांस अनुमोदन द्यावे लागत नाहीं त्या वगळून कोणत्याही सूचनेला अगर उपसूचनेला कोणीं अनुमोदन दिल्याखेरीज ती चर्चेकरितां घेतली जाणार नाहीं अथवा सभेच्या वृत्तांतांत नमूद करण्यात येणार नाहीं. | २१. एकदा परत घेतलेली सूचना त्याच सभेत पुन्हां मांडता येणार नाहींः–जर एखाद्या सभासदाने एकदां मांडलेली सूचना परत घेतली असेल अगर त्याने सूचनेस अनुमोदन देऊन नंतर ते काढून घेतले असेल तर त्यास त्याच सभेत सदरची सूचना मांडता येणार नाहीं, अगर अनुमोदन देता येणार नाही. परंतु थोड्या अवधीनंतर दुसन्या सभासदास तीच सुचना मांडण्याचा अधिकार राहील, सभातहकुबीच्या सूचनेरवेरीज दुस-या कोणत्याही सूचनेस अनुमोदन न मिळाल्यास ती सूचना पुन्हा त्या सभेत घेता येणार नाहीं. | २२. सूचना चर्चेस घेण्याचा क्रम अध्यक्ष यांनी ठरवावयाचाः-- एकाच वेळी एकापेक्षा अधिक सूचना सभेपुढे आल्यास अध्यक्षांस योग्य वाटेल त्या क्रमाने सुचना मतास घालण्यात येतील. । २३. सूचना अगर उपसूचनांचे दोन अगर अधिक स्वतंत्र ठराव करणेचा अध्यक्षांचा अधिकारः–अध्यक्षांना सभेपुढे असलेल्या कोणत्याही सूचना अगर उपसूचनांचे दोन अगर अधिक स्वतंत्र ठराव करून प्रत्येक ठरावास स्वतंत्र सूचक अगर अनुमोदक नसतानाही योग्य वाटेल तेव्हां व योग्य वाटेल त्या क्रमाने मतास टाकणेचा अधिकार आहे. तसेच विषय एकच असल्यास कार्यक्रमपत्रिकेवरील विचारासाठी असलेले निरनिराळे विषय, अध्यक्षांना, चर्चेकरितां एकल घेतां येतील. २४. चर्चाः–एखाद्या सूचनेस अगर उपसूचनेस अनुमोदन देण्यांत आल्यानंतर अध्यक्ष, ती सभेस वाचून दाखविण्यास सांगतील, व नंतर ती सभेपुढे चर्चेकरितां आली आहे असे समजण्यांत येईल. नंतर सूचना मांडणाच्या इसमानें त्या सूचनेच्या समर्थनपर भाषण करावे, अथवा त्याने आपले भाषण चर्चेच्या पुढील एखाद्या प्रसंगाचे वेळी करण्याकरितां राखून ठेवावे. एकादी सुचना अगर उपसूचना पुढे मांडण्यात आल्यावर व तिला