पान:सभाशास्त्र.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २९० (४) ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली त्यांवर चर्चा करण्यांत येणार नाहीं. (५) विचारलेल्या प्रश्नांची व त्यांस दिलेल्या उत्तरांची नोंद करून रेकॉर्डीत ठेवण्यात येईल. १७. सूचना (डराव) भांडणेः–सूचना किंवा उपसूचना मांडणाराने आपली प्रत्येक सूचना किंवा उपसूचना (तहकुबाच्या सूचनेसारख्या औपचारिक सूचनेखेरीज ) इंग्रजीत किंवा मराठीत लिहून ती मांडण्यापूर्वी अध्यक्षांजवळ दिली पाहिजे, १८. कांहीं विशिष्ट सूचनांवर (ठराव ) नियंत्रणः-(१) अगदी जरुरीचे प्रसंगाखेरीज व अध्यक्षांचे संमतीखेरीज कोणत्याही सभासदास जी सूचना सभेपुढे असलेल्या विषयाच्या चर्चेतून प्रत्यक्षपणे उत्पन्न झालेली नसेल अशा त-हेची सूचना पुढे आणण्याचा अधिकार नाही. (२) जनरल कमिटीच्या सभासदांना पुरविल्या जाणाच्या अजेंड्याद्वारे निदान एक आठवडा आगाऊ नोटीस दिल्याशिवाय ‘अविश्वासाचा ठराव एकाएक चर्चेस घेता येणार नाहीं. (३) कलम ३५ (८) अन्वये प्राधान्य (Priority ) मागण्यापूर्वी नोटीस द्यावीः-कामाचा क्रम ठरविणेबाबतच्या अध्यक्षांचे हक्कास बाध न आणतां कोणाही सभासदाला कार्यपत्रिकेवरील एखादा विशिष्ट विषय आध घेणेबाबत, सेक्रेटरीस (चिटणीस ) पूर्ण ( Clear ) तीन दिवसांची नोटीस दिल्याशिवाय ठराव मांडता येणार नाहीं. सेक्रेटरीस नोटीस मिळाल्याबरोबर ते सभासदांना त्यांचे पत्त्यावर पोष्ट-कार्डने ताबडतोब कळवतील. | अजेंड्यावरील विषयाला प्रायॉरिटी (प्राधान्य ) मागणेबाबतच्या प्रत्येक वर ज्या तारखेस सदर विषयाला प्रेफरन्स मागणे असेल त्या तारखेचा उल्लेख असावा. तथापि सदरचे ताररवेस प्रेफरन्स न मागितल्यास, व पुन्हा प्रेफरन्स मागणे असल्यास, तारीख नमूद करून एक निराळा अर्ज द्यावा लागेल, १९. सभासद हजर नसल्यास ठराव मांडणेची तरतूदः--जर एखाद्या सभासदाने एखादी सूचना आणण्याबद्दल पूर्वसूचना दिली असेल व सदरील सभासद ती सूचना मांडण्यास असमर्थ अगर नाखुष असेल तर हजर असलेल्या दुस-या एखाद्या सभासदाने, सदरील सभासदाच्या लेखी परवानगीने ती सूचना मांडावी.