पान:सभाशास्त्र.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८९ पुणे शहर म्युनिसिपालिटीने केलेले नियम १६. प्रश्न:-(१) खालील नियमांस अनुसरून, सभेच्या वेळी, मागील सभेचे वृत्तांत कायम केल्यानंतर व सभेचे काम सुरू होण्यापूर्वी अॅक्टांतील कलमाची अम्मलबजावणी अगर म्युनिसिपालिटीच्या कामाविषयी, म्युनिसिपल भासदानी, अध्यक्षांस उद्देशून प्रश्न विचारावे व त्या प्रश्नांस तोंड उत्तरे देण्यात येतील, (अ) सभेच्या अगोदर सात दिवस, ज्या सभासदांस प्रश्न विचारणे असेल त्यानं त्यासंबंधीं आगाऊ लेखी सूचना चीफ ऑफिसर यांस दिली पाहिजे. __(च) (1) ज्यावर मत प्रदार्शत करावे लागते अगर कायद्याच्या प्रश्नाचा उलगडा करावा लागतो अगर काल्पनिक गोष्टीवर, किंवा, (11) ज्याचा सरकारचे ताब्यात असलेल्या कोणत्याही भागांतील ट्रिब्यूनलपुढे अगर कोर्टात चालू असलेल्या खटल्याबाबत प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष संबंध असल्यास, किंवा (iii) ज्याचा म्युनिसिपालिटीच्या अधिका-याच्या अगर नोकराच्या वर्तणुकीशीं अगर वागणुकीशीं (त्यांचा ऑफिसचेबाबत असलेला संबंध सोडून ) संबंध येतो, किंवा (iv) ज्यामुळे नालस्ती होते अगर होऊ शकते अगर ज्यामुळे एखाद्या माणसावर अगर जातीवर वर्तणुकीबाबत आरोप होऊ शकतो, किंवा (v) म्युनिसिपालिटीने केलेल्या व त्यास सरकारी मंजुरी मिळालेल्या एखाद्या नियमाविरुद्ध जात असेल तर, अशा सर्व बाबींबाबत प्रश्न विचारता येणार नाहीं. (२) जर अध्यक्षांस विचारलेला प्रश्न हा त्यांचे मते क्षुद्र, त्रासदायक अथवा उपमर्दकारक असा असेल अथवा अध्यक्षांच्या मते विचारण्यांत आलेली माहिती प्रश्न विचारणारांस चीफ ऑफिसर यांजकडून सहज मिळण्याजोगी आहे असे वाटेल, अथवा सदरील प्रश्नांत विचारलेली माहिती उघड केली असतां म्युनिसिपालिटीचे हितसंबंधास बाध येईल असे वाटेल अगर म्युनिसिपल लायब्ररीतील छापील रेकार्डमधून, संबंधी म्युनिसिपल सभासदांना माहिती मिळत असल्यास, अशा त-हेचे प्रश्न विचारण्यास अध्यक्ष मनाई करू शकतील. । (३) अध्यक्षांस खाजगी स्वरूपाच्या पुरविलेल्या माहितीबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अध्यक्ष बांधलेले राहणार नाहीत, स....१९