पान:सभाशास्त्र.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८५ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम पात्रकेंत असलेली बाब तिजवर चर्चा सुरू होण्यापूर्वी जर दोन सभासदांनी लेखी अगर तोंडी विनात केल्यास पुढील सभेवर ढकलली जाईल. (५) सर्व सूचना व उपसूचना सुचविल्या पाहिजेत व त्यांना अनुमोदन असले पाहिजे. (६) भानगडीची सूचना अगर उपसूचना, चर्चेत गोंधळ उत्पन्न होऊ नये म्हणून विभागण्याचा सभापतीला अधिकार आहे. । (७) कायद्याचे प्रश्न व सभासंचालनाचे प्रश्न सभापतीने तडकाफडकीं निकाल लावावेत. (८) सभेपुढे सूचना आली म्हणजे कोणाही सभासदाला उपसूचना मांडतां येईल. एका उपसूचनेचा निकाल लावल्याशिवाय दुसरी उपसूचना आणता येणार नाहीं; मात्र चर्चातहकुबी आणतां येईल. उपसूचना पास झाल्यास ती ऐनसूचना म्हणून माडली जाईल व तिला उपसूचना सुचवितां येतील. (९) चर्चातहकुबी अगर सभातहकुबीला ताबडतोब अग्रक्रम दिला पाहिजे, ( १० ) हात वर करून मतदान केले पाहिजे. प्रश्नाचे बाजूने व विरुद्ध असे दोनदां मतदान होईल, (११) ठराव आणू इच्छिणाच्या सभासदाने ज्या समादिनी ठराव मांडावयाचा असेल, त्यापूर्वी दोन दिवस आगाऊ नोटीस दिली पाहिजे, (१२) वरील नियम ५ चा अपवाद सोडून पोटकमिटींना लागू आहेत. (१३) पोटकमिट्यांनी सोंपविलेल्या प्रश्नाबाबत निर्णयासाठी रिपोर्ट तयार करून स्थायी कमिटीकडे सादर करावेत. (१४) पोटकमिटींतील कोणाही सभासदाला, जर तो पोटकमिटीचे रिपोटशी सहमत नसेल तर आपली भिन्नमतप्रत्रिका स्थायी कमिटीपुढे आणवितां येईल,