पान:सभाशास्त्र.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २८४ यांतील वर्णन केलेल्या स्वरुपाचा असेल तर नगराध्यक्ष तो नामंजूर करील. उपप्रश्नाचे उत्तर तोंडीं देता येईल. । १२. उपप्रश्नाचे उत्तर नोटिशीशिवाय देता येणार नाही असे कमिशनरला सांगता येईल. तसे झाल्यास सदरहू उपप्रश्न नवा प्रश्न म्हणून योग्य नोटीस देऊन पुढील साधारणसभेत विचारता येईल. १३ नगरपालिकेचे हिताला विघातक होईल असे कमिशनरला वाटल्यास उपप्रश्नाचे उत्तर तो देणार नाहीं, तसेच उपप्रश्नाने विचारलेली माहिती विश्वासांत घेऊन मिळालेली असेल तर ती तो सांगणार नाहीं. १४. ज्या प्रश्नाचे उत्तर लेखी अगर तोंडी पूर्णपणे दिले असेल तो पुनः विचारता येणार नाही. १५. साधारणसभेचे पहिले दिवशीं विचारावयाचे प्रश्नाचे उत्तर तयार नाहीं असें कमिशनरने सांगितल्यास पुढील कोणत्याही तहकूब सभेचे दिवशी विचारणारा हजर असतांना सदरहू प्रश्नाचे उत्तर त्याला देता येईल. । १६. प्रश्नोत्तरासाठी निवडणुकीची बाब झाल्यानंतर व दुसरें कांहीही कामकाज सुरू होण्यापूर्वी फक्तं अर्धा तास दिला जाईल. या कालांत जे प्रश्न शिल्लक राहातील ते पुढल्या तहकूबसभेच्या दिवशीं विचारले जातील. | १७. प्रश्नोत्तरांची नोंद सभेचे वृत्तांतांत चिटणिसाकडून करण्यात येईल. || मुंबई नगरपालिकेचे स्थायी कमेटीचे कामकाजाबाबत नियम (१) चिटणीस प्रत्येक सभासदाकडे कार्यक्रमपत्रिका धाडील. एखादी बाब ताबडतोबीची असेल व सभासदांची संमति असेल तर ती कार्यक्रमांत नसली तरी घेता येईल. अन्यथा कार्यक्रमांतील बाबींचाच विचार होईल. (२) मागील सभेचा वृत्तांत सभासदांकडे फिरविला जाईल व तो मंजूर समजला जाईल. बहुसंख्याक सभासदांची मागणी आल्याशिवाय वाचला जाणार नाहीं. (३) वृत्तांतांतील चूक सभापतीचे नजरेस आणल्यास सभापति योग्य वाटेल ती दुरुस्ती त्यांत करील व नंतर त्यावर त्याची सही होईल. (४) ज्याबाबत तीन दिवसांची नोटीस दिली नसेल अशी कार्यक्रम ये ई