पान:सभाशास्त्र.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्युनिसिपल सभेत कामकाज चालविण्यासंबंधीं बॉम्बे म्युनिसिपल बरोज अॅक्टाचे ( १९२५) कलम ५८ (अ) अन्वयें पुणे शहर म्युनिसिपालिटीने केलेले नियम १. लहान सरनामा :–ह्या नियमांस, म्युनिसिपल सभांचे काम चालविण्यासंबंधी, पुणे शहर म्युनिसिपालिटीचे नियम असे म्हणावें. २. व्याख्या: ह्या नियमांमध्ये विषयाला अगर संदर्भाला कांहीं बाध येत नसल्यास (१) * कायदा' या शब्दाचा अर्थ मुंबई इलाख्यांतील बरोज म्युनिसि पालिट्यांचा सन १९२५ चा कायदा असा होतो. (२) याशिवाय कोणतेही शब्द अगर शब्दसमूह ज्या अर्थाने कायद्यांत वापरले आहेत त्याच अर्थाने येथे वापरले आहेत असे समजावे, ३. म्युनिसिपल बोर्डाची सभा बोलावण्याची नोटीस तयार करणेः–कार्याध्यक्षांच्या ( Presiding Authority ) हुकुमानें चीफ ऑफिसर हे बोडची सभा बोलाविण्याची नोटीस तयार करतील, अशी नोटीस कलम १९२ मध्ये ठरविण्यात आलेल्या पद्धतीने सभासदांवर बजाविण्यांत येईल, । ४. सर्व कागदपत्र टेबलावर ठेवणे :–सभासदांना, सभेपुढे येणाच्या विषयांची माहिती व्हावी म्हणून तिमाही साधारणसभेच्या आठ दिवस । आधीं व खास सभेच्या तीन दिवस आधीं सभेपुढे असणाच्या कार्यपत्रिकेवरील विषयांसंबंधी सर्व कागदपत्र (प्रत्येक विषयाच्या संक्षिप्त माहितीसह ) तयार करून टेबलावर ठेवण्यांत येतील, ५. सभेचे कार्य व विषयांचे क्रमांकः-चीफ ऑफिसर हे सभेच्या कामाची पद्धत खाली नमूद केल्याप्रमाणे ठेवतील :-- (१) मागील सभा अगर सभांचे वृत्तांत कायम करणे, (२) सभासदांनी विचारलेले प्रश्न व त्यांस दिली जाणारी उत्तरें. (३) बोडकडून होणाच्या सर्व निवडणुका अगर नेमणुका. (४) स्टैंडिंग कमिटीचे ठराव (कलम ३७). (५) इतर कोणत्याही कार्यकारी कमिटीचे ठराव ( कलम ३८). (६) मुंबई प्राथमिक शिक्षणाचा कायदा व त्याअन्वये केलेल्या नियमा नुसार असलेले स्कूल बोर्डाचे ठराव.