पान:सभाशास्त्र.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८३ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम مع عرعر مع مسيحي شعبي معمر میمی می تيتي تيتي تيتي تيتي تيتي تيتي تي اممم اممممم އދވހށއފއވރވމފހރގއވހކއކ... (७) पृच्छक गैरहजर असल्यास व त्याने लेखी अधिकारपत्र दिले असल्यास व ते अधिकारपत्र चिटणिसाजवळ सादर झाले असल्यास ज्या अधिकार दिला असेल त्याला अध्यक्ष प्रश्न विचारू देईल. पाचारिलें असतां प्रश्न विचारणाराने विचारला नाहीं अगर अधिकारपत्रान्वयेही कोणी विचारला नाहीं तर तो गळाला असे मानले जाईल. खालील स्वरुपाचे प्रश्न नगराध्यक्ष नामंजूर करील (८) १. एखाद्या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर अगर एखाद्या विषयासंबंध उत्तर दिल्यानंतर तीन महिनेपर्यंत त्याच संबंधांतील एखादा प्रश्न. २. कमिटीकडे सोपविलेल्या बाबीबद्दलचा प्रश्न जर कमिटीचा रिपोर्ट आला असेल तर, ३. उगाच लांबलचक असलेला प्रश्न. । ४. विचारके, व्यंजना, अनुमान अगर उपरोधात्मक शब्दरचना ज्यांत आहे असा प्रश्न. - ५. बदनामीकारक, अपमानकारक अगर अन्य रीतीने आक्षेपार्ह असलेला प्रश्न. असला प्रश्न विचारला गेल्यास हजर सभासदांचे सम्मतीने अध्यक्षाला वृत्तान्तांतून आक्षेपार्ह मजकूर कमी करून टाकण्याचा अधिकार आहे. ६. ज्यांत विचारणाराचे हितसंबंध कलम १६ यांत सांगितल्याप्रमाणे गुंतलें आहेत असा प्रश्न. ७. प्रश्नांत केलेल्या विधानाच्या सत्यतेची जबाबदारी विचारणारा घेणार नसेल, तर तो प्रश्न. ८, नगरपालिकेच्या छापील वृत्तान्तांतून अगर तिच्या कमिटीच्या छापील वृत्तान्तांतून ज्याचे उत्तर मिळण्यासारखे आहे असा प्रश्न ९. नियम ४ प्रमाणे केलेल्या यादीतील प्रश्नांची उत्तरे लेखी दिली जातील. १०. प्रश्नोत्तरांवर चर्चा होणार नाहीं. ११. उत्तर दिल्यानंतर उत्तरांतून निघणारा व उत्तरांतील माहिती स्पष्ट करून घेण्याचे दृष्टीने केलेला उपप्रश्न विचारता येईल. मात्र उपप्रश्न नियम ८