पान:सभाशास्त्र.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २८२

(अ) सात दिवसांची लेखी नोटीस चिटणिसास दिली पाहिजे व नोटिशींत प्रश्न स्पष्टपणे दिला पाहिजे. (ब) १. मतप्रदर्शन करावयास सांगणारा, तात्त्विक अभिप्राय मागणारा कायद्यासंबधीचा प्रश्न, अगर कांहीं गृहित परिस्थिति धरून विचारलेला प्रश्न विचारतां येणार नाहीं..। २. न्यायालयप्रविष्ट बाबींसंबंधीचा प्रश्न विचारता येणार नाही. ३. त्यांच्या अधिकारी अगर सार्वजनिक नात्याशी संबंध नसलेला असा प्रश्न म्युनिसिपल अधिकारी अगर नोकर यांच्याबाबतींत विचारता येणार नाहीं. ४. कोणाही व्यक्ति अगर जातीविरुद्ध आरोप करणारा अगर प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षपणे बदनामीकारक असणारा प्रश्न विचारता येणार नाहीं. (२) वर १ यांतील मर्यादातिक्रमण करणारा प्रश्न नगराध्यक्ष नामंजूर करील. । (३) प्रश्न मर्यादेत आहे की नाही या बाबतीत शंका उत्पन्न झाल्यास नगराध्यक्ष त्याचा निर्णय देईल व तो अखेरचा मानला जाईल, (४) नगरपालिकेचे हिताला विघातक होईल असे कमिशनरला वाटल्यास प्रश्नाचे उत्तर तो देणार नाही. तसेच विश्वासात घेऊन सांगितलेली माहिती प्रश्नाने विचारल्यास तो सांगणार नाहीं. (१) साधारणसभेच्या पहिल्या दिवशी फक्त प्रश्न विचारले जातील. (२) प्रश्न कोणत्या सभेत विचारावयाचे आहेत हें नोटिशीत स्पष्ट असलें पाहिजे. (३) तीनपेक्षा अधिक प्रश्न कोणाही सभासदाला एका सभेत विचारतां येणार नाहींत. (४) योग्य नोटिशीने आलेल्या व नगरध्यक्षाने नामंजूर न केलेल्या प्रश्नांची आलेल्या क्रमानुसार चिटणीस यादी करील व ती यादी प्रश्न आणणा-यांचे नांवनिशीसुद्धां सभासदांत फिरविली जाईल. (५) ठरलेल्या सभेचे दिवशी निवडणुकीची बाब असल्यास ती झाल्या नंतर अध्यक्ष प्रश्नांसाठी सभासदांना यांदीचे क्रमाप्रमाणे पाचारण करील. (६) पाचारल्यानंतर सदरहू सभासदानें जागी उभे राहून आपले प्रश्न यादीतील क्रमाप्रमाणे विचारावेत.