पान:सभाशास्त्र.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७९ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम व त्या दिवसाच्या सभेत भाग घेता कामा नये. १५ दिवसांत दोनदां बाहेर जाण्याची आज्ञा एखाद्या सभासदाचे बाबतींत झाल्यास सदरहू सभासदाने पंधरा दिवसांपेक्षा अधिक नाही इतका काल सभेत हजर राहू नये अशी आज्ञा अध्यक्षाला देतां येईल, । तथापि सदरहू सभासदाने समाधानकारक माफी मागितल्यास अध्यक्षास तहकुबीच्या शिक्षेची राहिलेली मुदत माफ करता येईल. या शिक्षेचे मुदतींत सभासदाला नगरपालिकेच्या सभेव्यतिरिक्त कोठल्याही कमिटीवर काम करण्यास प्रत्यवाय येणार नाहीं. २. सभेमध्यें दंगल माजल्यास अध्यक्षाला तीन दिवसांपेक्षा अधिक नाहीं इतका काल सभा तहकूब करण्याचा अधिकार आहे. ३. मांडावयाचा ठराव इंग्रजी भाषेत स्वच्छ अक्षरांत लिहिलेला असावा अगर छापलेला असावा. सूचकानें तो वाचावा व वाटल्यास त्यावर भाषण करावे. नंतर तो अध्यक्षास द्यावा. सदरहु सूचनेस अगर ठरावास अनुमोदन मिळाल्यास तो सभेपुढे चर्चेस आला आहे असे मानले जाईल, अनुमोदकाला समर्थनार्थ, त्याच वेळी बोलतां येईल. वाटल्यास त्याने आपले भाषण राखून ठेवून पुढे करावे. | (३४) सूचना मांडल्यानंतर व तिला अनुमोदन मिळाल्यानंतर कोणाही सभासदाला उपसूचना सदरहू सूचनेला देता येईल. उपसूचनेला अनुमोदन अवश्य पाहिजे. ते न मिळाल्यास ती गळेल. एकाच वेळी अनेक उपसूचना सभेपुढे असू शकतील. (३५) सूचना अगर उपसूचना सभागृहाचे परवानगीशिवाय परत घेतां येणार नाही व ही परवानगी बिनविरोध मिळाली पाहिजे. (कोणीही त्याविरुद्ध आवाज उठविल्यास ती मिळणार नाही.) ( ३६ ) सूचनेवर बोलल्यानंतर उपसूचना आल्यास त्यावर बोलण्याचा सदरहू सभासदाला हक्क आहे. मात्र ते भाषण उपसूचनेतील विषयापुरते मर्यादित असले पाहिजे, ० (३७) उपसूचना ज्या क्रमाने मांडल्या असतील त्याच्या उलट क्रमाने त्या मूळ प्रश्नाविरुद्ध मतास टाकल्या जातील, म्हणजे मूळ ठराव व शेवटची उपसूचना हे एकमेकांविरुद्ध मतास टाकले जातील, यांपैकीं जें पास होईल