पान:सभाशास्त्र.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २८० त्याविरुद्ध आधींची उपसूचना मतास टाकली जाईल. याप्रमाणे मताचा क्रम राहील. । (३८) चर्चातहकुबी अगर सभातहकुबीची सूचना आल्यास त्याबाबत बाजूने व विरुद्ध असलेली कारणे सांगण्यासाठी सभासदांना जितका वेळ अध्यक्षाला योग्य वाटेल तितका त्याने द्यावा व नंतर ताबडतोब ती मतास टाकावी. (३८ अ) ३८ नियमाखाली असलेली सूचना मोघम असावी, परंतु तिला विवक्षित कालमर्यादा अगर विवक्षित घटनामर्यादा, जसे कमिशनरचा अगर कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत अशी घालता येते. याव्यतिरिक्त अन्य मर्यादांचा समावेश करण्यांत आला असल्यास ३२ नियमाप्रमाणे ती सूचना न ठरतां ३४ नियमाप्रमाणे चर्चित प्रश्नाला ती उपसूचना समजली जाईल. (३९) सभासदाचे भाषण चालू असतां चर्चा-तहकुबी अगर सभातहकुबी मांडतां येणार नाहीं. (४०) सभेत एकदां चर्चा अगर संभातहकुबी आणल्यानंतर पुनः किती वेळाने ती आणतां येईल हे अध्यक्षाला योग्य वाटेल तसे त्याने ठरविले पाहिजे व तेवढा काल गेल्याशिवाय तशी सूचना आणता येणार नाहीं. (४१) सभासदाचे भाषण चालू असतांनासुद्धा अध्यक्षाला योग्य वाटल्यास बहुसंख्याक सभासदांचे सम्मतीने सभा तहकूब करता येते. | (४१ अ) बोलणाच्या सभासदाचे भाषण संपतांच कोणाही अन्य सभासदाला सभेने पुढील विषय चर्चेला घ्यावा अशी सूचना मांडतां येते व या सूचनेस अनुमोदन मिळाल्यास त्यावर चर्चा होऊ न देतां ती मतास टाकली पाहिजे व ती पास झाल्यास चालू विषय (चर्चित विषय-Question under discussion ) गळाला असे मानले जाईल. (४२ ) स्थायी कमिटीनें अगर कमिशनरने तांतडीचा म्हणून आणलेला विषय मांडू द्यावा की नाही या प्रश्नाव्यतिरिक्त अन्य सर्व प्रश्नांचा निकाल हजर असलेल्या व मत देणाच्या सभासदांचे बहुमताने लागेल. समान मते पडल्यास अध्यक्षाला दुसरें अगर जादा मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्नावर मत घतांना बाजूचे व विरुद्ध कोण असे दोनदा विचारून घेतले जाईल. मत हात वर करून दिले पाहिजे.