पान:सभाशास्त्र.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २७८ (२७) ठराव मांडणाराला वीस मिनिटांपेक्षा अधिक बोलू द्यावे की नाहीं हे अध्यक्षाने आपल्या अधिकारांत ठरवावे. तसेच उपसूचना आणणारांस अगर चर्चेत भाग घेणाच्या सभासदांस दहा मिनिटांपेक्षा जास्त बोलू द्यावे की नाहीं हें अध्यक्षाने आपले अधिकारांत ठरवावें. | (२८) अंदाजपत्रकातील बाबींव्यतिरिक्त कोठलेही भाषण संपताच कोणाही सभासदाला ‘प्रश्न मतास टाकावा' अशी सूचना कांहीही चर्चा न करतां मांडता येते. सूचनेस अनुमोदन मिळाल्यास व या सूचनेने समानियमांचा दुरुपयोग होत नाहीं अगर अल्पसंख्याकांवर अन्याय होत नाही असे अध्यक्षास वाटल्यास, सदरहू सूचना ताबडतोब मतास टाकली जाईल. सूचना पास झाल्यास ठराव मांडणारास उत्तर देण्याचा हक्क आहे; मात्र हे उत्तरादाखलचे भाषण दहा मिनिटांत संपलें पाहिजे. उत्तरानंतर ज्यावर चर्चा चालू होती तो ठराव अगर उपसूचना ताबडतोब मतास टाकली जाईल. | (२९) चर्चेत सभासदाला एकदाच बोलतां येईल, ठराव आणणारास अगर त्याचेऐवजी अनुमोदन देणारास चर्चेचे शेवटीं उत्तरादाखल बोलतां येईल. जो सभासद बोलून चुकला असेल त्याला आपले भाषणाबाबत खुलासा करण्यासाठी दुसरा बोलत असतां ताबडतोब जर त्याने वाव दिला तर उभे राहतां येते व खुलासा करता येतो; पण जर' बोलणा-याने वाव न दिला तर त्याचे भाषणसमाप्तीनंतर खुलासा करता येतो. (३०) संचालनविषयक अगर अन्य आक्षेप सभेत उत्पन्न केले की त्यांवर निर्णय, अध्यक्षाने चर्चा वगैरे न करूं दैतां तडकाफडकीं दिला पाहिजे. अध्यक्षाचे निर्णयाविरुद्ध नगरपालिकेच्या पुढच्या सभेत दाद मागता येईल, दिलेला निर्णय चूक आहे असा ठराव आणून दाद मागितली पाहिजे व या ठरावाची नियम १० प्रमाणे नोटीस दिली पाहिजे. (३१) एखाद्या सभासदाबाबत आक्षेप उपस्थित झाल्यास अध्यक्ष त्यास उपस्थित केलेल्या आक्षेपावर निर्णय देईपर्यंत भाषण बंद करण्यास सांगेल व तसे सांगतांच सभासदाने खाली बसले पाहिजे. आक्षेपाबाबत अध्यक्ष वाटल्यास सदरहू सभासदाला बोलू देईल. (३२) १. अध्यक्षाला सभेत शिस्त व व्यवस्था ठेवण्याचा अधिकार आहे. गैरशिस्त वर्तन करणा-या सभासदाला तो बाहेर जाण्यास आज्ञा देईल आणि याप्रमाणे अध्यक्षाने आज्ञा केल्यास सभासदानें सभा सोडून बाहेर गेले पाहिजे