पान:सभाशास्त्र.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७७ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम ރމނނވރކށވއތރވމފދތރވގތކރވގނނނރ (२२) हजर असलेल्या सभासदांनी बहुमताने मत देऊन कार्यक्रमपत्रिकेंतील एखादी बाब आधी घ्यावी असे ठरविल्यास तिला अग्रक्रम मिळून ती आधी घेतली जाईल, | अग्रक्रम द्यावा ही विनंतीवजा सूचना निदान त्याबाबत एक दिवसाची आगाऊ नोटीस चिटणिसाला दिल्याशिवाय सामान्यतः आणतां येणार नाहीं व सभेपुढे ठेवली जाणार नाही व अशी नोटीस असल्यास ती सर्व सभासदांना चिटणिसाने कळविली पाहिजे. कार्यक्रमांतील एखाद्या बाबीबद्दल अग्रक्रम मागणाच्या विनंति-अर्जात कोणत्या दिवशी मागणी करावयाची आहे हे स्पष्ट दिले पाहिजे. त्या दिवशी मागणी न केल्यास पुनः दुसरा अर्ज त्या बाबीबाबत अग्रक्रम पाहिजे असल्यास केला पाहिजे व त्यांतही दिवस नमूद केला पाहिजे, | (२३) दोन अगर अधिक बाबी एकाच विषयासंबंध असल्यास व त्या कार्यक्रमपत्रिकेंत निरनिराळ्या म्हणून जरी ठेवल्या असल्या तरी हजर असलेल्या बहुसंख्याक सभासदांचे सम्मतीने त्या एकवटून एकाच वेळीं अध्यक्षाला विचारासाठीं सभेपुढे ठेवता येतील. तसेच एकाच दिवशी दोन सभा बोलाविल्या असल्यास व दोन्हींच्या कार्यक्रमांत एकाच विषयासंबंधीच्या बाबी असल्यास, हजर असलेल्या बहुसंख्याक सभासदांचे सम्मतीने त्या सर्व बाबींचा विचार एकवटून एकाच सभेत करावा असे अध्यक्षास ठरविता येईल. | (२४) एखादी सूचना अगर उपसूचना भानगडीची आहे व ती तशीच सभेपुढे ठेवल्यास गोंधळ व गैरसोय होईल असे अध्यक्षास वाटल्यास त्याला ती दोन अगर अधिक भागांत विभागून भागशः सभेपुढे ठेवता येईल. | याप्रमाणे सूचना अगर उपसूचना अध्यक्षाने विभागल्यास पहिल्या सूचनेव्यतिरिक्त अगर उपसूचनेव्यतिरिक्त सभेपुढे येणाच्या कोठल्याही त्यांच्या भागाला पृथकपणे मांडण्याची अगर अनुमोदन देण्याची अध्यक्षानें अन्यथा सांगितल्याशिवाय जरूर नाही. मात्र प्रत्येक भाग स्वतंत्रपणे अध्यक्षाने मतास टाकला पाहिजे. | (२५) हजर असणाच्या व प्रश्नावर मत देणाच्या बहुसंख्याक सभासदांचे संमतीशिवाय लेखी भाषणे वाचता येणार नाहींत. (२६) सभासदाने उभे राहून व अध्यक्षाला उद्देशून भाषण केले पाहिजे, अध्यक्षाने विनंति करतांच सभासदानें ताबडतोब खाली बसले पाहिजे.