पान:सभाशास्त्र.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २७६ ३. स्थायी समितीच्या अगर स्कूल कमिटीच्या अगर इम्यूव्हमेंट कामटीच्या माजी अध्यक्षाचे मृत्यूनिमित्त. ४. राजकुटुंबीयांचे अगर राजप्रतिनिधींचे मृत्यूनिमित्त. याव्यतिरिक्त व्यक्तींचे मृत्यूनिमित्त तहकुबीची सूचना आणतां येणार नाहीं; मात्र १५ मिनिटेंपर्यंत सभेचे काम तहकूब करावें एवढी सूचना आणतां येईल व ती पास झाल्यास १५ मिनिटें सभा तहकूब राहील व नंतर सभाकार्य सुरू होईल. (१५) सभेचे कामकाज इंग्रजीत चालेल, ज्या सभासदाला इंग्रजीत बोलणे जमणार नाही त्याला गुजराथी, मराठी, हिंदी अगर उर्दूत बोलण्यास स्वातंत्र्य आहे. (१६) हजर असलेल्या सभासदांची नांवे दाखल करून सभेतील कामकाजाचा वृत्तान्त सभा संपल्यानंतर योग्य रीतीने तयार करण्यांत येईल व तो चिटणीस वृत्तान्तग्रंथांत लिहील आणि त्यावर पुढच्या सभेत अध्यक्ष सही करील, वृत्तान्तग्रंथ म्युनिसिपल कचेरीत सभासदांना कचेरीचे वेळांत पाहता येईल. इतरांना तो पाहणे असल्यास फी द्यावी लागेल. (१७) मागील सभेचा वृत्तान्त वाचून मंजूर असे समजले जाईल. हजर असलेल्या बहुसंख्याक सभासदांनीं विनंति केल्यास तो प्रत्यक्ष वाचला जाईल. (१८) हजर असलेल्या सभासदाने वृत्तन्तांतील चूक नजरेस आणल्यास अध्यक्ष सभेचे मत घेऊन ज्या दुरुस्त्या सुचवील त्या केल्या जातील. (१९) स्थायी कमिटीचे ठराव तिच्या सभापतीने मांडले पाहिजेत. त्याने न मांडल्यास अगर तो गैरहजर असल्यास तिच्या अन्य सभासदानें अगर त्यानेही न मांडल्यास कोणाही सभासदाने मांडावेत. (२०) स्कूल कमिटीचे पत्रासंबंधीचे सर्व ठराव तिच्या सभापतीने मांडावेत. त्याने न मांडल्यास तिच्या अन्य सभासदाने, त्यानेही न मांडल्यास अन्य कोणाही समानदाने मांडावेत. (२१) नाटसि दिलेला ठराव नोटीस देणाराने अगर त्याला अनुमोदन देणारानें अगर ज्याने तो मांडावा असा लेखी अधिकार नोटीस देणाराने दिला असेल त्याने न मांडल्यास, तो वगळला असे मानले जाईल. ( लेखी अधिकार पत्र ठराव मांडणे झाल्यास अध्यक्षाकडे दिले पाहिजे. )