पान:सभाशास्त्र.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७५ कांही संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम कमिटीने तांतडीचा म्हणून आणलेल्या विषयाचा पाठपुरावा न करणारा असा कोणताही ठराव आणता येणार नाही. मात्र हजर असलेल्या सभासदांपैकी तीनचतुर्थांश, आणि हे तीनचतुर्थांश १५ पेक्षा कमी नसले पाहिजेत इतक्या सभासदांनीं सम्मति दिली तर सदरहू तांतडीचा विषय सभेपुढे येईल. ( १३ ) तांतडीचे प्रश्नाचा विचार करण्यासाठी बोलविलेल्या प्रार्थित सभेत अगर अंदाजपत्रकाची चर्चा करण्यासाठी भरलेल्या सभेत तांतडीचे प्रश्नार्थी संबंध नसलेला अगर अंदाजपत्रकाशी संबंध नसलेला कोणताही विषय आणता येणार नाहीं अगर त्याबाबत ठराव करता येणार नाहीं; तसेच अंदाजपत्रकाची चर्चा करण्यासाठी भरलेल्या सभेत स्थायी कमिटीने सुचविलेल्या करव्यवस्थेत फरक सुचविणारी अगर तिने ठरविलेल्या खर्चयोजनेत बदल सुचविणारी कोणतीही सूचना नियम ५ प्रमाणे प्रसिद्ध होणा-या नोटिशांत अगर नियम १० प्रमाणे प्रसिद्ध होणाच्या पुरवणी जाहिरातींत समाविष्ट झाली नसेल तर आणता येणार नाही. तसेच अंदाजपत्रकावरील चर्चा तहकूब सभेत होत असेल तर सदरहू सूचना नियम १४ तील शतबरहुकूम नसेल तर आणतां येणार नाहीं. ( १४ ) हजर असलेल्या बहुसंख्याक सभासदांचे सम्मतीने सभा वेळोवेळी तहकूब करता येईल. परंतु तहकूबसभेत मागील जे विषय कार्यक्रमपत्रिकेवर होते, पण ज्यांचा निकाल लागला नाहीं तेवढ्याच विषयांची चर्चा होईल; अन्य विषय अगर ठराव सभेपुढे येणार नाहींत. तथापि जर तहकूबसभा अंदाजपत्रकाचा विचार करणारी असेल तर अंदाजपत्रकांत बदल सुचविणारी सूचना जरी मागील सभेतील शिल्लक राहिलेला विषय नसला तरी त्या सभेपुढे आणता येईल. मात्र १. सदरहू सूचनेची नोटीस मागील सभेचे वेळी दिली असली पाहिजे. २. तहकुबी निदान तीन दिवसांची असली पाहिजे व, ३. निदान सभादिनापूर्वी एक दिवस तरी सदरहू सूचनेची जाहिरात निदान एका तरी स्थानिक वर्तमानपत्रांत चिटणिसाने दिली असली पाहिजे (सूचना आल्यास चिटणीसाला जाहिरात द्यावीच लागेल.) ( १४ अ ) नगराध्यक्षाला सभा खालील परिस्थितींत तहकूब करता येईल, १. विद्यमान अगर माजी सभासदाचे मृत्यूनिमित्त २. माजी नगराध्यक्षाचे मृत्यूनिमित्त ।