पान:सभाशास्त्र.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २७४ १. मागील साधारण अगर दरम्यान खास सभा झाली असल्यास त्या सभेतील वृत्तांतमंजुरी, २. नगरपालिकेने करावयाच्या निवडणुकी. ३. प्रश्नोत्तरें. ४. अर्ज. ५. स्थायी कमिटीचे व खास कमिट्यांचे ठराव. ६. स्कूल-कमिटीकडील महत्त्वाचा पत्रव्यवहार. ७. कमिशनरने ठेवलेली पत्रे व कामकाज, ८. सरकारकडून व अन्यांकडून आलेली पत्रं. ९. कामट्यांचे रिपोर्ट, १०. ठरावांच्या नोटिसा. (१०) सभेच्या कार्यक्रमांत संपूर्णतया नसलेली एखादी बाब अगर अन्य कांहीं विषय सभासदाला सभेपुढे आणावयाचा असल्यास सभादिनापूर्वी निदान त्यासंबंधीं तीन दिवस नगरपालिकेच्या चिटणिसाला त्याने नोटीस दिली पाहिजे. अशा नोटिसा आल्यास त्या निदान एका तरी स्थानिक वर्तमानपत्रांत चिटणिसाने समादिनाचे आदल्या दिवसापर्यंत प्रसिद्ध केल्या पाहिजेत. (११) ठरावांत एखादा भाग बदनामकारक अगर आक्षेपार्ह आहे असे वाटल्यास नगराध्यक्षाने तो काढून टाकला पाहिजे; आणि जर त्यास योग्य वाटेल तर त्याने संपूर्ण ठरावसुद्धां नामंजूर करावा. जर आक्षेपार्ह असा ठराव प्रत्यक्ष सभेपुढे सुचविला गेला असेल तर हजर असलेल्या सभासदांचे सम्मतीने अध्यक्षाला वृत्तान्तांतून सदरहू भाग काढून टाकतां येईल, (१२) तांतडीच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी बोलाविलेल्या प्रार्थित सभेरखेरीज अगर अंदाजपत्रकाचा विचार चालला असतांची वेळ सोडून अन्यथा सभेपुढे नोटिशीनें प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमपत्रिकेतील विषयांव्यतिरिक्त कोणताही विषय अगर सदरहू प्रसिद्ध झालेल्या नोटिशीत कमिशनरनें अगर स्थायी कभिटीने एखादा विषय तांतडीचा म्हणून समाविष्ट केला नसल्यास तो सर्भ पुढे येणार नाहीं. नोटिशींत उल्लेख नसलेला अगर नियम १० प्रमाणे प्रसिद्ध झाला नसलेला कोणताही विषय सभेपुढे चर्चेस येणार नाहीं अगर त्याबाबत कांहीही ठराव मांडता येणार नाही. तसेच कमिशनरनें अगर स्थायी