पान:सभाशास्त्र.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४, २७३ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम काम प्रकटपणे चालणार नाहीं. सभाकायत अडथळा उत्पन्न करणाच्या कोणालाही बाहेर काढण्याचा अध्यक्षाला अधिकार आहे. (५) तहकूबसभा सोडून अन्य सभेला सात दिवसांची नोटीस दिली पाहिजे. स्थायी समितीच्या निदान चार सभासदांनी लेखी मागणी केल्यावरून बोलाविलेल्या सभेला निदान तीन दिवसांची नोटीस दिली पाहिजे, मात्र या प्रार्थित सभेत वार्षिक अंदाजपत्रकाचा विचार करता येणार नाहीं. तहकूबसभेची नोटीस सभा किती काळ तहकूब झाली हे लक्षात घेऊन सोयीस्कर रीतीने दिली पाहिजे. सभेच्या नोटिशीत सभेची वेळ, स्थळ व कार्यक्रम दिला पाहिजे. तसेच नोटीस स्थानिक वर्तमानपत्रांत व तहकूब व प्रार्थित सभा सोडून मुंबई गॅझेटमध्ये जाहीर रीतीने ती प्रसिद्ध झाली पाहिजे. (६) सभा चालू असतां अध्यक्षाला धरून २५ पेक्षा कमी सभासद हजर आहेत असे अध्यक्षाचे नजरेस आणून दिल्यास त्याने सभा तहकूब केली पाहिजे. तहकूब करतांना पुढे ती कोणत्या दिवशी भरणार तो दिवस, वेळ व जागा त्याला सोईस्कर वाटेल तशी ठरवून जाहीर केले पाहिजे. शिल्लक राहिलेले कामकाज तहकूबसभेचे दिवशीं घेतले जाईल अगर पुनः सभा तहकूब झाल्यास ज्या दिवशी ती भरेल त्या दिवशी घेतले जाईल. मग २५ सभासदांची गणसंख्या हजर असो अगर नसो. (७) प्रत्येक सभा मेयरचे अध्यक्षतेखाली चालेल. त्याची जागा रिकामी असल्यास अगर सभेचे वेळीं तो गैरहजर असल्यास हजर सभासद ज्याला सभापति निवडतील त्याचे अध्यक्षतेखाली सभेचे काम चालेल. (८) नगरपालिकेने एखाद्या सभासदाची कामटीचा सभापति म्हणून निवड केली असल्यास व नगराध्यक्ष त्या कामटीचा सभासद असल्यास जेव्हां तो हजर असेल तेव्हां त्या कमिटीचे काम त्याचे अध्यक्षत्वाखाली चालेल; अन्यथा प्रत्येक कमिटीने आपला सभापति निवडला पाहिजे, (९) नगरपालिकेच्या कमिशनरनें खालील क्रमानुसार कार्यक्रमपत्रिका तयार केली पाहिजे, स...१८