पान:सभाशास्त्र.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २७२ •••••••• | मुंबई नगपालिकेचे महत्वाचे नियम (Corporation ) कामकाजाचे प्रत्येक वर्षाचे पहिल्या सभेत नगरपालिका आपल्या सभासदांपैकी एकाला दुस-या वर्षीचे पहिल्या सभेपर्यंत नगराध्यक्ष ( Mayor) म्हणून निवडील. दरम्यान कांहीं कारणाने अध्यक्षाची जागा रिकामी झाल्यास राहिलेल्या मुदतीचद्दल नगरपालिका जागा रिकामी झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर सभासदांतून एकाची निवड करील. ( कलम ३७). कलम ३६ प्रमाणे समाविषयक व संचालनविषयक नियम करण्याचा नगरपालिकेला अधिकार आहे. विद्यमान नियमांपैकी महत्त्वाचे नियम खाली दिले आहेत. (१) मुंबई नगरपालिकेबाबतचा १८८८ चा कायदा आहे त्याबरहुकूम नगरपालिकेच्या सभांचे काम चालले पाहिजे. (२) प्रत्येक महिन्याला एक साधारणसभा भरेल; मार्च महिन्याची साधारणसभा त्या महिन्याचे २० तारखेपूर्वी भरली पाहिजे. सार्वत्रिक निवडणुकीनंतरची एप्रिल महिन्यांतील पहिली सभा त्या महिन्यांतील सोयीस्कर दिवशीं भरेल व सभेची वेळ व जागा कमिशनर ठरवील त्या दिवशी सदरहू सभा न भरल्यास कमिशनर पुढे कोणत्या दिवशी ती भरेल हे ठरवील, याव्यतिरिक्त प्रत्येक सभेचा दिवस, वेळ व जागा मेयर ठरवील. त्याच्या मृत्यूमुळे, राजिनाम्यामुळे, अगर अन्य काही कारणाने त्याची जागा रिकामी असल्यास अगर तो अधिकारहीन झाल्यास, स्थायी समीतीचे सभापतीने वरील गोष्टी ठरवाव्यात. | (३) नगराध्यक्ष अगर वरील परिस्थितीत सभापति योग्य वाटल्यास खास सभा बोलावल; मात्र निदान १६ सभासदांनीं अगर स्थायी कमिटीचे चार सभासदांनी सह्यांनिशी खास सभेची लेखी मागणी केल्यास, ती बोलाविलीच पाहिजे. (४) प्रत्येक सभा प्रकटपणे काम करील व जनतेला हजर राहता येईल. मात्र सभेपुढे असलेल्या एखादे बाबीवरील चर्चा अगर चौकशी प्रकटपणे होऊ नये. असा ठराव अध्यक्षाने आपण होऊन अगर अन्य सभासदानं आणल्यास व हजर असलेल्या सभासदांनी बहुमतानें तो पास केल्यास सभेचे