पान:सभाशास्त्र.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र २७० गव्हर्नर जनरल व सभागृह यांच्यातील दळणवळण ( १७० ) गव्हर्नर-जनरल सभागृहापुढे भाषण करून आपले आदेश सांगेल व त्या वेळी सभासदांना हजर राहण्याची तो आज्ञा देईल, अध्यक्षाकडे लेखी संदेश धाडून त्याला आपले आदेश सभागृहाला देतां येतात अगर तो मुंक्कामावर हजर नसल्यास तारेने संदेश धाडतां येतो व त्यावर तो खरा असल्याबद्दल संबंध असलेल्या मंत्र्याची सही असते. पुरवणी नियम ( १७२ ) सभागृहांत झालेल्या कामकाजाचा संपूर्ण वृत्तांत तयार करण्याची व्यवस्था चिटणीस करील व अध्यक्षाचे आज्ञेप्रमाणे सदरहू वृत्तांत वेळोवेळी प्रासद्ध केले जातील. ( १७३ ) कामकाजाचे आज्ञेप्रमाणे अध्यक्षाला असलेले अधिकार सर्व अगर कांहीं लेखी हुकुमाने उपाध्यक्षाला त्याला देतां येतात. परििशष्ट १ बिगरसरकारी बिलें व ठराव यांचा क्रम ठरविण्यासाठी बॅलटची रीत १. नेमलेल्या दिवसापूर्वी निदान १७ दिवस आधीं क्रमांकांची यादी चिटणीस सभागृहकचरात ठेवील; ती दोन दिवस राहील, या कालांत ठरावाची नोटीस देणाच्या अगर दिली असलेल्या सभासदाने तसेच बिलाची नोटीस देणाच्या अगर दिली असलेल्या सभासदानें यादीत ठरावाचे बाबतींत एकाच आंकड्यापुढे आपले नांव दाखल करावें; बिलाचे बाबतींत एका आंकड्यापुढे एका बिलाबद्दल याप्रमाणे तीन आंकड्यांपुढे नांव दाखल करण्याचा त्याला अधिकार आहे. | २. कमिटीचे खोलीत चिटणीसाचे देखरेखीखाली बॅलट होईल त्या वेळी सभासदाला हजर राहता येईल, ३. यादीत नांव दाखल केलेल्या आंकड्याबरहुकूम चिट्या तयार करण्यांत येतील. ४. या चिठ्या एका पेटीत ठेवण्यात येतील व त्यांतून कारकून एक एक चिठी उचलील, उचललेल्या चिठ्ठीवरून सभासदाचे नांव यादींतून काढून चिटणीस जाहीर करील व ते नांव कामकाजाचे यादीत पहिले ठेवील. या