पान:सभाशास्त्र.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ सभाशास्त्र •••••••• मांडण्यापूर्वी दोन दिवस आगाऊ नोटीस दिली पाहिजे, अशी नोटीस नसेल तर, व अध्यक्ष त्या बाबतींत नियम तहकुब करील तर, सूचना मांडतां येणार नाही. ( १६६) सभागृहाची मान्यता अवश्य असलेल्या एखाद्या बाबीवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च झाला असेल तर त्या अधिक रकमेबाबतची मागणी फडणिसांने सभागृहापुढे सादर केली पाहिजे व सभागृह तिचा अंदाजपत्रकांतील मागणीप्रमाणे विचार करील, (१६७) (१) १. वार्षिक अंदाजपत्रकाचे वेळी मंजूर केलेली रक्कम साल मजकुरीचे खर्चाकरतां कमी पडली अगर २. अंदाजपत्रकाचे वेळी उपलब्ध नव्हती, पण नंतर खर्चाची नवी बाब उत्पन्न झाली व त्यावरील खर्चाला सभागृहाची मंजुरी घेणे अवश्य झाले म्हणजे जरूर झालेल्या पुरवणी मागणीचा अगर अधिक मागणीचा अंदाज सभागृहापुढे ठेवला पाहिजे. तथापि जर नवीन बाबींवर होणा-या खर्चाची रक्कम पूर्वी मंजूर केलेल्या एखाद्या बाबींतील मागणीचे रकमेतून ओढून घेऊन उभी करावयाची असेल तर, सभागृहापुढे सर्वं रकमेची मागणी न करतां नाममात्र रकमेची मागणी करता येते व ती मान्य झाल्यास पूर्वी मंजूर झालेल्या रकमेतून रकमा ओढून घेऊन नवीन बाबींवर खर्च करता येतो. (२) पूर्वी नामंजूर केलेली अगर कमी केलेली मागणी पुनः पूरक अगर अधिक मागणी म्हणून अंदाज सादर करून सभागृहापुढे आणतां येते. (३) पूरक अगर अधिक मागणीचा विचार अंदाजपत्रकातील मागण्या समजून सभागृह करील, (१६८) १. प्रत्येक विधिमंडळाचे पहिल्या अधिवेशनांत सार्वजनिक हिशोबसमिति नेमली जाईल (Public Account Committee) व ती विधिमंडळ असेपर्यंत राहील. हिंदुस्तानसरकारनें उत्पन्न कसे खर्च केले व त्या बाबतींतला हिशोबतपासनिसाचा रिपोर्ट व फडणिशीखाते ज्या अन्य गोष्टी ठरवील या सर्वांचा विचार ही कमिटी करील, २. सभापतीशिवाय १२ पेक्षा अधिक नाहींत इतके सभासद या कमिटीवर असतील व त्यांपैकी निदान ३ सभासद सभागृह क्रमदेय-मतदान-पद्धतीने निवडील; राहिलेले गव्हर्नरजनरल नेमील,