पान:सभाशास्त्र.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २६६ ००० •••••••••••••• • •••••••••• केलेली मागणी त्याचेवर असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी अवश्य आहे असे त्याला वाटल्यास ती नामंजूर झालेली असो अगर ती कमी केलेली असो ती मान्य केली आहे असे समजून त्याला वागतां येते. ७. तांतडीचे प्रसंगी शांतता व संरक्षणासाठी जरूर तो खर्च करण्याचा गव्हर्नर-जनरलला हिंदुस्थानचे कारभाराबाबतचे कायद्यांतील ८७ अ कलमांत कांहीही असले तरी, अधिकार आहे. ( १५८) जेव्हां गव्हर्नर-जनरल इन् कौन्सिल सभागृहाने नामंजूर केलेली अगर कमी केलेली मागणी त्यावर असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जरूर आहे असे तो जाहीर करतो, व ती मान्य झाली आहे असे समजून वागतो, अगर तांतडीचे प्रसंगी शांतता व संरक्षणासाठी आपल्या अधिकाराने गव्हर्नर-जनरल खर्च करतो, तेव्हां फडणिसाने त्या बाबतींत गव्हर्नर-जनरल इन् कौन्सिलने अगर गव्हर्नर-जनरलने काय काय केले आहे हे दर्शविणारे निवेदन शक्य तितक्या लवकर सभागृहापुढे सादर केले पाहिजे. मात्र केलेल्या कृत्याबद्दल कोणतीही सूचना आणतां येणार नाहीं अगर निवेदनावर चर्चाही होणार नाहीं. ५ (१५९) १. शक्य तर प्रत्येक खात्याची एक अशी पृथक् मागणी असावी; तथापि फडणिसाला योग्य वाटल्यास दोन खात्यांची मिळून एक मागणी करता येईल अगर एखादी मागणी कोठल्याही खात्यांत नीटपणे बसत नसेल तर स्वतंत्र म्हणून मांडतां येईल. | २. प्रत्येक मागणींत प्रथम मागितलेल्या वटरकमेचा निर्देश असावा व नंतर तपशीलवार मागणींतील एक एक बाब घेऊन खर्चाचे अंदाज दिलेले असावेत. ३. नियमाला अनुसरून फडणिसाने त्याला सभागृहाला विचार करण्यास जास्तीत जास्त सोयीचे होईल असे वाटेल त्या स्वरुपांत अंदाजपत्रक मांडाधे, | (१६० ) अंदाजपत्रकाचा विचार सभागृह दोन टप्प्यांनीं अगर दोन अवस्थेत करते ।। १. सर्वसामान्य चर्चा. २. मागणीचा विचार व त्यावरील मतदान. (१६१) १. अंदाजपत्रक सादर केले असेल त्या दिवसानंतर जो दिवस गव्हर्नर-जनरल ठरवील त्या दिवशी व जितका काळ या कामासाठीं तो देईल