पान:सभाशास्त्र.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६३ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम

| तथापि तोच ठराव कार्यक्रमपत्रिकेत पुढे दुसच्या सभासदाचे नांवावर असल्यास त्याला ठराव मांडण्याचा अधिकार या सभासदाला देता येतो. अधिकार दिल्यावर त्या सभासदाला तो ठराव मांडता येईल, | २. पाचरले असतां गैरहजर असेल तर गैरहजर सभासदाने लेखी अधिकारपत्र ठराव मांडण्यासाठी दुसन्या सभासदाला दिले असल्यास तो त्या गैरहजर सभासदाचे नांवावर असलेला ठराव अध्यक्षाने संमति दिल्यास मांडू शकेल, (१४४) ठरावावरील भाषण अध्यक्षाचे परवानगीशिवाय पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ करता येणार नाही. मात्र ठराव मांडणारा सभासद आणि ठरावांतील विषयाशी संबंध येणारा मंत्र यांना पहिल्या भाषणाचे वेळी ३० मिनिटें अगर अध्यक्षाचे परवानगीने अधिक काळ बोलतां येईल. (१४५) ठरावावरील चर्चा सर्वस्वी विषयाला धरून असली पाहिजे. (१४६) ठराव मांडल्यानंतर नियमानुसार त्याला उपसूचना मांडतां येईल. | (१४७) १. उपसूचनेची नोटीस ठराव मांडण्याचे दिवसापूर्वी दोन दिवस आगाऊ दिली पाहिजे व ती तशी दिली नसेल तर त्याबाबत आलेला आक्षेप अध्यक्ष मान्य करील. मात्र अध्यक्षाने नियम तहकूब केल्यास व परवानगी दिल्यास उपसूचना केव्हाही मांडता येईल. | २. चिटणिसाने वेळ असल्यास उपसूचना छापून सभासदांकडे तिच्या प्रति धाडाव्यात. ( १४८ ) १. ठराव अगर उपसूचना सभासदाने मांडल्यानंतर त्याला सभागृहाचे परवानगीशिवाय जे मांडले असेल ते परत घेता येणार नाही, २. अध्यक्षाचे परवानगीशिवाय परत घेण्याचे परवानगीसूचनेवर चर्चा होणार नाहीं. | ( १४९ ) १. जेव्हां ठरावाला एक अगर अधिक उपसूचना सुचविल्या गेल्या असतील तेव्हां अध्यक्ष सभागृहाचे मत घेण्यापूर्वी मूळ ठराव व त्यावरील सर्व सूचना वाचून दाखवील अगर तत्संबंधीं कथन करील. २. आधी ठराव मतास घालावा का उपसूचना मतास घालावी, अगर कोणत्या क्रमाने उपसूचना मतास घालाव्यात हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे.