पान:सभाशास्त्र.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २६ 0 ३. या बैठकीत कामकाज कसे चालावे हें बैठकीतील सभासदांनी ठरवावे. ४ कौन्सिलचा अध्यक्ष या बैठकीची जागा व वेळ ठरवील. (१३०) एका मंडळाकडून दुस-या मंडळाकडे जाणारा संदेश एका मंडळाचा चिटणीस दुस-या मंडळाचे चिटणिसाला धाडील अगर दोन्ही मंडळे ठरवितील त्याप्रमाणे धाडला जाईल, ( १३१) १. जन्मदात्या मंडळाने संयुक्त कमिटीकडे विल सोपपावे अशी सूचना पास केल्यास तसा संदेश दुस-या मंडळाकडे धाडला जाईल व त्यांत मान्यतेची इच्छा समाविष्ट असेल. २. दुस-या मंडळाने सूचना मान्य केल्यास प्रत्येक मंडळांत कमिटीवरील सभासदांची नेमणूक करण्याची सूचना मांडली जाईल, संयुक्त कमिटींत दोन्ही मंडळांचे सभासद सारख्या संख्येने नेमले पाहिजेत. ३. संयुक्त कमिटीचा सभापति, तिचे सभासद निवडील. त्याला फक्त एकच मत असेल. समसमान मते झाल्यास प्रश्न नामंजूर झाला असे समजले जाईल, ४. या कमिटीच्या सभेची जागा व वेळ कौन्सिलचे अध्यक्ष ठरवितील. ( १३२) कौन्सिलने पास केलेले बिल विधिमंडळाने पास केले म्हणजे । अध्यक्षाचे सहीनिशीं विधिमंडळाचा चिटणीस कौन्सिलचे चिटणिसाकडे गव्हर्नर जनरच्या सम्मतीसाठी ते सादर करण्यासाठी धाडील, कामकाजासंबंधी काढलेल्या अज्ञांची दुरुस्ती (Amendment of Standing Orders ) (१३३) गव्हर्नर-जनरच्या संमतीने विधिमंडळाला कामकाजासंबध काढलेल्या आज्ञांत दुरुस्ती करता येते, | हिंदुस्थानचे कारभाराबाबतचे कायद्याखाली केलेल्या नियमांना विसंगत असणारी आज्ञा विसंगतीचे प्रमाणांत विधियुक्त नाहीं. (१३४) १. आज्ञा दुरुस्त करावयाची असेल तर निदान १ महिन्यांची नोटीस पाहिजे व नोटिसीबरोबर काय दुरुस्ती करावयाची आहे याचा मसुदा दिला पाहिजे, अध्यक्षाने परवानगी दिल्यास या मुदतीपूर्वीही दुरुस्ती मांडता येईल. २. दुरुस्तीच्या सूचना अध्यक्ष सांगेल त्या दिवशींचे कार्यक्रमांत ठेवल्या जातील,