पान:सभाशास्त्र.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २५६ (११८ ) जर बिलांत दुरुस्त्या होऊन पास झाले असेल तर दुरुस्त्यासुद्धा सदहू विल जन्मदात्या सभागृहाकडे केलेल्या दुरुस्त्यांना मान्यता द्यावी अशा संदेशासह धाडले जाईल, | ( ११९ ) दुरुस्त बिल जन्मदात्या मंडळाकडे आले म्हणजे पुढील सभेचे दिवशी त्याच्या प्रति टेबलावर ठेवण्यांत येतील. | ( १२० ) प्रति टेबलावर ठेवल्यानंतर सरकारी बिल असल्यास सरकारी सभासदाला अगर बिनसरकारी विल असल्यास कोणाही सभासदाला तीन दिवसांचे नोटिशीनंतर अगर अध्यक्षानें सम्मति दिल्यास नोटिशीशिवाय केलेल्या दुरुस्त्या विचारात घ्याव्या अशी सूचना मांडतां येते. ( १२१ ) १. दुरुस्त्या विचारात घ्याव्यात ही सूचना पास झाल्यास अध्यक्षाने त्याला चर्चेला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने त्या सभागृहापुढे ठेवाव्यात. । २. केलेल्या दुरुस्यांना त्यांतील विषयांचे दृष्टीने धरून असणाच्या दुरुस्त्या अगर उपसूचना मांडतां येतील. याशिवाय बिलाला अन्य दुरुस्ती सुचवितां येणार नाही. मात्र दुस-या मंडळांत झालेल्या दुरुस्तीमुळे एखादी आनुषंगिक दुरुस्ती अवश्य झाल्यास मांडता येईल. तसेच त्या मंडळाने केलेल्या दुरुस्तीला विकल्पी असणारी (Alternative ) दुरुस्ती पण मांडतां येईल. (१२२ ) १. दुस-या मंडळाने केलेल्या दुरुस्त्या मान्य झाल्यास त्याप्रमाणे संदेश त्या मंडळाला धाडला जाईल. २. जर दुस-या मंडळाने केलेल्या दुरुस्त्या सर्वत्र अमान्य असतील अगर कांहीं अमान्य असतील तर ते बिल अमान्यतेच्या संदेशासह त्या मंडळाकडे धाडले जाईल. ३. जर दुस-या मंडळाच्या दुस-या अगर त्यांतील एखादी दुरुस्ती कांहीं अधिक दुरुस्त्या करून मान्य आहेत अगर त्या मंडळाचे दुरुस्त्यांऐवजी दुसच्या दुरुस्त्या सुचविल्या असतील तर, ते बिल केलेल्या दुरुस्त्यांसह त्या केल्या आहेत अशा संदेशासह दुस-या मंडळाकडे धाडले जाईल. ४. याप्रमाणे बिल आल्यानंतर दुस-या मंडळाने वाटल्यास जन्मदात्या सभागृहाकडून जसे प्रथम बिल आले होते तसेचे तसे पास करावें अगर पुनः दुरुस्त होऊन आले तसे पास करावें अगर दुरुस्त होऊन आलेले बिल आपण केलेल्या दुरुस्त्या ज्या जन्मदात्या सभागृहाने अमान्य केल्या आहेत, त्या बिलात असल्याच पाहिजेत असा संदेश देऊन परत करावें.