पान:सभाशास्त्र.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५५ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम •••••••••••• दोन्ही मंडळांतील विधिकरणाबाबत कामकाज चालण्याची रीत (११० ) हिंदुस्थानच्या राज्यकारभाराबाबतच्या कायद्यांत अन्यथा सांगितलें नसेल तर प्रत्येक बिल दोन्ही मंडळांत, दुरुस्या दोन्ही मंडळांनी मान्य केल्यास, दुरुस्तीसह अगर दुरुस्तीशिवाय पास झाले पाहिजे, म्हणजे ते बिल पास झालें. (१११) ज्या मंडळांत प्रथम मांडले गेले असेल त्याने पास केल्यानंतर ते बिल दुस-या मंडळाचे टेबलावर पुढच्या बैठकीत ठेवले जाईल. (११२) प्रति टेबलावर ठेवल्यानंतर सरकारी सभासदाला जर बिल सरकारी असेल तर, अगर अन्य कोणाही सभासदाला जर बिल बिगरसरकारी असेल तर, बिल विचारांत घ्यावें या सूचनेची नोटीस देतां येते. (११३ ) नोटिशीनंतर तीन दिवसांनीं अगर अध्यक्षाने सांगितल्यास त्यापूर्वीही विचारांत घ्यावे ही सूचना कार्यक्रमपत्रिकेत ठेवली जाईल व ज्या दिवसाच्या कार्यक्रमपत्रिकेत ती असेल त्या दिवशी नोटीस देणारा सभासद ती मांडलि. | (११४) ज्या दिवशी ही सूचना मांडली जाईल त्या दिवशीं अगर ज्या दिवशी या सूचनेवर चर्चा होईल त्या दिवशी फक्त बिलांतील तत्त्वावर वादविवाद होईल. बिलांतील तपाशलाबाबत चर्चा करतां येणार नाहीं. (११५ ) जर ते बिल जन्मदात्या सभागृहांत (Originating Chamber) निवडक कमिटीकडे अगर दोन्हीं मंडळांच्या संयुक्त कमिटीकडे सोंपविले गेलेले नसेल तर कोणाही सभासदाला तें कमिटीकडे सोपवावे अशी दुरुस्ती अगर उपसूचना मांडतां येईल व ती पास झाल्यास निवडक-कमिटीकडे ते बिल जाईल व निवडक कमिटी नेमणाच्या मंडळाचे नियमांप्रमाणे त्या कमिटीचे काम चालेल, (११६) विचारात घ्यावें ही सूचना पास झाल्यास त्या मंडळाचे नियमांप्रमाणे त्या बिलाचे पुढील सर्व काम चालेल. | (११७) बिल जर प्रथम विधिमंडळाने पास केले असेल व नंतर कौन्सिलने ते जसेचे तसे पास केले तर विधिमंडळाला त्याप्रमाणे संदेश धाडला जाईल, जर बिल प्रथम कौन्सिलने पास केले असेल व नंतर विधिमंडळाने जसेचे तसे पास केले तर कौन्सिलला त्याप्रमाणे संदेश धाडला जाईल,