पान:सभाशास्त्र.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २५४ (१०१) असा अर्ज कोणाही सभासदाला सभागृहाला सादर करता येतो. तसेच चिटणिसाकडे तो आल्यास तो आला असल्याची सूचना विधिमंडळाला देईल. त्यावर चर्चा होणार नाहीं. (१०२) जेव्हां सभासद अर्ज सादर करतो त्या वेळी त्याला फक्त खालील प्रमाणे कथन करण्याचा अधिकार आहे. * मी, अमुक लोकांनी अमुक बिलाबाबत सह्या करून केलेला अर्ज सादर करीत आहे यावर चर्चा होणार नाहीं. | (१०३) १. प्रत्येक अधिवेशनाचे सुरवातीस अध्यक्ष अर्ज-कमिटी नेमील, या कमिटींत उपाध्यक्ष जो या कमिटीचा सभापति असेल व अन्य चार सभासद • ज्यांपैकी एक सभापतिमंडळांतील असेल असे पांच जण असतील. उपाध्यक्षाचे गैरहजेरीत सभापति कमिटीचा सभापति राहील. २. अधिवेशनांत कमिटीवरील एखादी जागा रिकामी पडल्यास अध्यक्ष वाटल्यास ती भरून काढील, | (१०४ ) सभासदाने सादर केलेला अगर चिटणिसाने ज्याबाबत सूचना दिली असेल असा प्रत्येक अर्ज कामटीकडे सोपविला जाईल, (१०५) आलेला प्रत्येक अर्ज कमिटी तपाशील. नियमाप्रमाणें तो असल्यास तो कोणत्या बाबतीत आहे, किती जणांनी त्यावर सह्या केल्या आहेत, याबाबत विधिमंडळाला कमिटी रिपोर्ट करील व योग्य वाटल्यास तो विलाबाबतचा एक कागद म्हणून फिरता करील. रिपोर्टात अर्ज फिरता केला की नाहीं याचा उल्लेख असला पाहिजे. फिरता केला नसेल व करणे योग्य आहे असे अध्यक्षास वाटल्यास त्याबाबत अध्यक्ष आज्ञा देईल. सर्वच अर्ज अगर त्याचा सारांश अध्यक्षाने आज्ञापिल्याप्रमाणे फिरता केला जाईल. | ( १०६) प्रत्येक अर्ज १. इंग्रजीत व छापील असला पाहिजे किंवा इंग्रजींत त्याचे भाषांतर करून त्याची छापील प्रत अर्जाबरोबर दिली पाहिजे. २. सभासदाने सादर केल्यास सभासदाची सही. त्यावर असली पाहिजे. ३. सभ्य व शिष्ट भाषेत तो असला पाहिजे. (१०७) अर्जावर प्रत्येक अर्जदाराचे पूर्ण नांव व पत्ता व सही अगर आंगठा असला पाहिजे. (१०८) विधिमंडळाला उद्देशून तो असावा व त्यांत बिलाबाबत काय मागणी आहे हे निश्चित लिहिलेले असावे. (१०९) अर्ज परिशिष्ट २ यांतील नमुन्याप्रमाणे शक्य तितका असावा.