पान:सभाशास्त्र.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ सार्वजनिक सभातंत्र वारंटाशिवाय पकडण्याचा गुन्हा असेल तर पकडतात, दंगल झाली व शांतताभंग टळत नसेल तर सर्वांना बाहेर काढतात. लिव्हरपूलचे पोलीस, शांतताभंग झाला अगर शांतताभंग अटळ आहे असे कळले तरच, सभागृहांत जातात. सभेत शांतता राखणें अगर अडथळा करणारास बाहेर काढणे हे त्यांचे काम नाहीं. दंगल झाल्यास सर्वांना बाहेर काढतात. त्याचप्रमाणे गंभीर गुन्हा झाला असेल तर त्या गुन्हेगारास पकडतात; बाकीच्यांचे पत्ते, नांवे मिळवून देण्यास मदत करतात. मॅचेस्टरमध्ये सभाचालकांनी मागणी केल्यास सभेचे सुरवातीपासून बंदोबस्तासाठी पोलीस देण्यात येतात, मात्र त्यांना सभागृहांत न ठेवता, जवळ पण दुसरे जागी ठेवतात. सभाचालक अगर सभेचे अध्यक्ष यांनी बोलाविले म्हणजे ते सभागृहांत येतात व त्यांचे देखरेखीखालीं वागतात. पण प्रत्यक्ष शांतताभंग झाल्याशिवाय कुणालाही ते बाहेर काढीत नाहींत. ते काम चालकांचे आहे. शांतताभंग होऊ नये एवढेच त्यांचे पाहणे असते. सभाचालकांना नियमाप्रमाणे पोलिसांचा भत्ता द्यावा लागतो. बर्मिंगहॅममध्ये लिव्हरपूलप्रमाणेच व्यवस्था आहे; फक्त राजकीय सभेला पोलीस मागविले तर भत्ता द्यावा लागत नाहीं. सामान्यतः असे म्हणता येईल की, बंदिस्त जागेतील सभेत असाधारण परिस्थिति झाली, दंगाधोपा झाला अगर जबरदस्त संभव आहे असे असेल तरच, पोलिसांनी आंत शिरावे, एरवीं नाहीं, असा प्रघात इंग्लंडमध्ये आहे. (Report of the Departmental Committee on Police Practice, I909). निवडणुकीची सभा मोडणे हा गुन्हा आहे हे खरे. तथापि त्या सभेतसुद्धा शांतताभंग झाल्याशिवाय अगर होत असेल तर पोलीस मध्ये पडतात. प्रत्यक्ष गुन्हा घडत असलेला पाहिला तर गन्हेगारांना पकडतात. ( Metropolitan Police views of the Public Meetings Act, May, 1913.) सभा म्हणजे अनेक माणसे कायदेशीर हेतूसाठी एकत्र येऊन विचारविनिमयाने काम करणारी घटना. पण हीं अनेक माणसे जर गैरकायदा गोष्टी करण्यासाठी एकत्र आलीं, अगर गैरकायदा गोष्टी करण्यासाठी एकत्र राहिली तर ही माणसें म्हणजे गैरकायदा जमाव ठरतो (Unlawful Assembly). गैरकायदा जमाव जरूर ती शक्ति उपयोगात आणून उधळून लावण्याचा अधिकार पोलिसांना सर्वत्र आहे. गैरकायदा जमावाची व्याख्या पीनल कोडाचें कलम १४१ मध्ये दिली आहे. तिचा सारांश असा की, पांच अगर पांचांपेक्षा