पान:सभाशास्त्र.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र १८ सोडावा व त्याप्रमाणे लोक न गेले तर ती सभा गैरकायदा जमाव होते.” ( Where a public meeting with lawful object and conducted lawfully provokes a breach of peace and it is impossible to prevent the breach by any other means than by dispersing the meeting, the magistracy and the police may call upon the meeting to disperse and if it refuses, it becomes an unlawful assembly.) शांतताभंग होऊ न देण्याचा अधिकार म्हणजे आनयंत्रितपणे वागण्याचा अगर नागरिकॉच्या मौलिक हक्कांवर आक्रमण करून त्यांच्या सभा मोडून टाकण्याचा आधिकार नव्हे. वाटेल त्या गोष्टीला महत्त्व देऊन शांतताभंग झाला अगर होणार आहे असे म्हणून चालणार नाही. जें सभेत होत आहे त्याने दृढ व धीवुद्धीचे लोक (firm and courageous ) आहेत त्यांच्या मनांत भीति उत्पन्नं झाली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. घाबरट, भिलट, टीकेला, चेष्टेला, टाळ्यांना भिणाच्या लोकांना भीति वाटते म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करणे योग्य नाहीं, खरोखर कांहीं तरी गंभीर गुन्हा होण्याचा जबरदस्त संभव आहे व त्या योगाने शांतताभंग निश्चित होईल असे वाटल्याशिवाय पोलिसांनी मध्ये पडू नये. तसेच सभेचे हेतू कायदेशीर व सभा कायदेशीरपणे चालली असतां विरोध होऊन शांतताभंग होईल अशी भीति आहे म्हणून सभा बंद करण्याचा अधिकार पोलिसांना प्राप्त होत नाही. शांतताभंग होऊ नये म्हणून अधिक पोलीस-बंदोबस्त ठेवणे हा योग्य उपाय आहे. कायदेशीर सभाच बंद करणे हा उपाय नाहीं. बेकायदेशीर गोष्टी करण्यास विरोधक तयार होतील म्हणून कायदेशीर सभा बेकायदेशीर होऊ शकत नाही. तसे होऊ लागले तर * कायद्याचा अमल संपून गुंडांचा अमल जारी आहे असे होईल; जमावाचा कायदा (mob-rule) प्रभावी ठरेल.” शांततेचे संरक्षण म्हणजे न्याय्य हक्कांवर आक्रमण नसावे व गुंडगिरी व गैरशिस्तपणाला उत्तेजन नसावे या दृष्टीने ते असले पाहिजे, | सभेत शांततासंरक्षणाचे दृष्टीने इंग्लंडमधील पोलिसांची व्यवस्था विचारांत घेण्यासारखी आहे. लंडनमध्यें सभेचे जागेजवळ अगर रस्त्यांत, वाहतुकीस अडथळा न होईल व तिचे योग्य नियंत्रण होईल यासाठी पोलीस ठेवण्यांत येतात. प्रत्यक्ष शांतताभंग झाला तरच आंत पोलीस प्रवेश करतात, कोणा तक्रार केली तर तक्रार करणारास आरोपी यांची नांवें व पत्ते मिळवून देतात.