पान:सभाशास्त्र.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५३ कांही संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम wwwwwwwww . . .. . २. जर विलांत दुरुस्ती झाली असेल तर त्याच दिवशीं बिल पास व्हावें । ही सूचना मांडतां येणार नाही. मात्र हा नियम अध्यक्षाने आपले अधिकारांत तहकूब केल्यास तशी सूचना त्याच दिवशी आणता येईल, ३. आक्षेप आल्यास व अध्यक्षाने नियम तहकूब न केल्यास तो मान्य होईल व मग बिल पास व्हावे ही सूचना पुढे केव्हा तरी आणली पाहिजे. । ४. बिल पास व्हावे ही सूचना आली असतां औपचारिक अगर आनुघंगिक म्हणजे विचारांत घ्यावे या सूचनेचे वेळीं पास झालेल्या दुरुस्तीमुळे अवश्य झालेली अशीच दुरुस्ती अगर उपसूचना फक्त आणता येईल. • (९५) विल आणणाच्या सभासदाला बिलाचे कोणत्याही अवस्थेत ते परत घेण्याची परवानगी सभागृहाकडे मागतां येते आणि परवानगी दिल्यास त्या दिलाबाबत मग कोणतीही सूचना नंतर करता येणार नाही. (९६) अधिवेशन समाप्त झाल्यानंतर जी विलें मांडली गेली असतील ती सर्व दुसन्या अधिवेशनाचे चालू कामाचे यादींत घातली जातील. दोन पुच्या अधिवेशनांत जर मांडलेल्या बिलाबाबत मांडणाच्या सभासदानें कांहीही सूचना न आणल्यास ते बिल बाद होते. माल तिस-या अधिवेशनांत सदरहू सभासदानें सूचना आणून सभागृहाची खास परवानगी मिळविल्यास ते पुनः चालू कामाचे यात येते. (९७) विधिमंडळाचे विघटन झाल्यास, मांडलेली, टेबलावर ठेवलेली व हिंदी विधिमंडळाने पास न केलेली सर्व बिलें बाद होतात.. (९८) बिल पास झाल्यानंतर त्याच्या एका प्रतीवर अध्यक्षाने सही करावी. (९९) १. दोन्ही मंडळांनी जरी बिल पास केले तरी ते फेरविचारासाठी विधिमंडळाकडे गव्हर्नर जनरलला धाडतां येते. २. फेरविचारार्थ बिल आलें म्हणजे अध्यक्ष फेरविचार करण्यासाठीं धाडलेले मुद्दे, ज्याप्रमाणे दुरुस्त्यांवर चर्चा होते व मत घेतले जाते त्याप्रमाणे अगर त्या दृष्टीने सभागृहाला जे जास्त सोयीचे वाटेल, त्याप्रमाणे सभागृहापुढे मांडील. बिलाबाबत अर्ज (१००) ज्याची नोटीस दिली आहे अगर जे मांडले आहे अगर जें प्रसिद्ध झाले आहे अशा विलाबाबत विधिमंडळाकडे अर्ज करता येतो.