पान:सभाशास्त्र.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

=" " " """*

सभाशास्त्र २५२ •••••• - (९०) १. ज्यांना गव्हर्नर जनरलच्या आगाऊ मंजुरीची नियमाप्रमाणे आवश्यकता आहे अशी दुरुस्ती सदरहू मंजुरी मिळाल्याशिवाय सुचवेतां येणार नाहीं. दुरुस्तीचे नोटिशीबरोबर मंजुरीची प्रत दिली पाहिजे, ती नसेल तर नोटीस विधियुक्त नाहीं. . | २. कोणत्या दुरुस्तीला मंजुरी लागते की नाही, अशी शंका उपस्थित झाल्यास तो प्रश्न गव्हर्नर जनरलकडे सोपविला पाहिजे व त्याचा निर्णय अखेरचा राहील. (९१) १. बिलाचा विचार ज्या दिवशी होणार असेल त्यापूर्वी दोन दिवस प्रत्येक दुरुस्तीची अगर उपसूचनेची नोटीस दिली पाहिजे, अशी नोटीस नसेल व तत्संबंधी आक्षेप आल्यास दुरुस्ती मांडता येणार नाहीं; मात्र अध्यक्षाने आपले मर्जीत हा नियम तहकूब केल्यास आक्षेप गैरलागू ठरून दुरुस्ती मांडतां येईल. २. सुचविण्यात येणाच्या प्रत्येक दुरुस्तीची नोटीस वेळ असल्यास छापवून घेऊन चिटणिसाने प्रत्येक सभासदाला तिची एक प्रत पुरवावी. ३. इंग्रजी न कळणाच्या सभासदानें विनंति केल्यास चिटणिसाने त्याचे साठीं अध्यक्ष सांगेल त्या भाषेत नोटिशींचे भाषांतर करून त्याला पुरवावें. | (९२ ) सामन्यतः कलमांच्या क्रमानुसार दुरुस्त्यांचा विचार होईल. कलम विचारात घेतले की त्याला दिलेल्या उपमूचनांचा अगर दुरुस्त्यांचा विचार होईल. प्रत्येक कलमाबाबत ‘हें कलम बिलाचा भाग असावे अशी सूचना मांडली गेली आहे असे समजले जाईल. | (९३) नियमांत कांहीं जरी असले तरी बिल विचारात घ्यावें ही सूचना पास झाल्यानंतर अध्यक्षाला आपल्या मर्जीप्रमाणे सर्व विल अगर त्याचा कोणताही भाग कलमवार चर्चेला ठेवता येईल, आणि जेव्हां कमलवार चचों व्हावी असे तो ठरवील त्या वेळी प्रत्येक कलम तो घेईल व त्यावरील चचों व त्यावरील दुरुस्त्यांचा निकाल झाल्यानंतर हे कलम अगर हे दुरुस्त झालेले कलम बिलाचा भाग असावे असा प्रश्न मतास टाकील. (९४) १. बिल विचारात घ्यावे ही सूचना पास झाली व जर बिलांत कोणतीही दुरुस्ती झाली नसेल तर बिल आणणाच्या सभासदाला, बिल पास व्हावे ही सूचना ताबडतोब आणतां येईल,