पान:सभाशास्त्र.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५१ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww मर्यादा ठेवून सही करीत आहों असा उल्लेख केला पाहिजे व भिन्नमतपत्रिकाही त्याच वेळी दिली पाहिजे. । (८६) १. बिल आणणाच्या सभासदाने निवडक कमिटीचा रिपोर्ट सभागृहाला सादर केला पाहिजे. । २. रिपोर्ट सादर करतांना भाषण करणे झाल्यास सदरह सभासदाने फक्त वस्तुस्थितीचा निर्देश करावा; त्या वेळी कोणतीही चर्चा होणार नाहीं. (८७) १. निवडक कमिटीने दुरुस्त केलेले बिल व त्यावरील तिचा रिपोर्ट अशी दोन्हीं गॅझेटांत प्रसिद्ध केली जातील. चिटणिसाने रिपोर्ट छापून घेऊन प्रत्येक सभासदाला त्याची प्रत धाडली पाहिजे. | २. जर एखाद्या सभासदाला इंग्रजी येत नसेल तर व त्याने विनंति केल्यास त्या रिपोर्टचे भाषांतर त्या सभासदासाठीं अध्यक्ष सांगेल त्या देशी भाषेत करवून त्याला दिले पाहिजे. (८८) १. निवडक कमिटीचा अखेरचा रिपोर्ट सभागृहाला सादर केल्यानंतर बिल आणणाच्या सभासदाला पुढीलप्रमाणे कोणतीही सूचना मांडता येईल :- (अ) रिपोर्टाची प्रत सभासदांना मिळून सात दिवस झाले असल्यास अगर हा मुदतीचा नियम अध्यक्षानें तहकूब केला तर त्यापूर्वी, निवडक कमिटीने रिपोर्टोंबरोबर सादर केलेले बिल विचारात घ्यावे. (ब) निवडक कमिटीने रिपोर्टाबरोबर सादर केलेले विल पुनः निवडक कमिटीकडे ( १ ) जसेचे तसे सोपवावें, अगर (२ ) विशिष्टं कलमांचा अगर विशिष्ट दुरुस्तीचा विचार करण्यासाठी सोपवावें, अगर (३) विशिष्ट कलम घालावे असा आदेश देऊन सोपवावें. (क) ते बिल पुनः लोकमत अंदाजण्यासाठी फिरतें करावें. २. बिल मांडणाराने बिल:विचारांत घ्यावे अशी सूचना मांडल्यास ते पुनः कमिटीकडे सोपवावें अगर फिरते करावे अशी उपसूचना कोणाही सभासदाला आणता येईल. बिलाचा विचार, त्यावर उपसूचना आणि ते पास होणे । (८९ ) बिल विचारात घ्यावे ही सूचना पास झाल्यानंतर कोणाही सभासदाला त्यांत दुरुस्ती करण्यासाठी उपसूचना सुचविता येईल.