पान:सभाशास्त्र.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २५० असेल तो निवडक सामितीचा सभापति होईल. समितीतील सभापतीला समान मते झाली असतां दुसरें अगर जादा मत देण्याचा अधिकार आहे. ४. सभापति गैरहजर असेल तर वर ( ३ ) मध्ये दिलेल्या क्रमानें जो हजर असेल त्याने सभापति व्हावे व सभापतित्वाचे अधिकार चालवावे. । ५. निवडक कमिटीला तज्ज्ञांचा पुरावा घेतां घेईल. तसेच विलामुळे ज्यांचे खास हितसंबंधांवर परिणाम होणार असेल त्यांच्या प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतां येईल. ६. कायदेमंत्रि अगर संबंध असलेला कार्यकारी सभासद विधिमंडळाचा सभासद जरी नसला तरी निवडक कमिटीचे बैठकीस त्याला हजर राहातां • येईल. तिचे चर्चेत भाग घेता येईल, मात्र तिचा सभासद तो असणार नाही. (८४) १. कमिटीचे नेमणुकीचे वेळी तिला किती सभासदांची गणसंख्या ( Quorum ) असावी हे ठरविले जाईल, २. कमिटीचे सभेचे ठरलेले वेळीं अगर सभा सुरू होऊन काम चालू असता गणसंख्या हजर नसेल तर सभापति गणसंख्या जमेपर्यंत अगर पुढील दिवसापर्यंत कमिटीची बैठक तहकूब करील. ३. गणसंख्येचे अभावी लागोपाठ दोन वेळां कमिटीची बैठक तहकूब करावी लागली तर सभापतीने या गोष्टीचा विधिमंडळाकडे रिपोर्ट करावा. (८५) १. बिल गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर निवडक कमिटीने त्यावर रिपोर्ट करावा, २. प्रसिद्धीनंतर निदान तीन महिन्यांनी हा रिपोर्ट व्हावा. विधिमंडळाने खास आदेश दिल्यास आधी करता येईल. कर बसविणा-या बिलाला वरील मुदतीचा नियम लागू नाहीं. ३. रिपोर्ट प्राथमिक अगर अखेरचा करतां येतो. ४. रिपोर्टात नियमाप्रमाणे बिल प्रसिद्ध झाले आहे की नाही, त्याचप्रमाणे प्रसिद्धीची तारीख यांचा उल्लेख असला पाहिजे. जर कमिटीने बिलाचे स्वरूप इतके बदलले असेल की, त्याला पुनः प्रसिद्धीची जरूर आहे असे कमिटीचे मत असल्यास, त्याप्रमाणे, अगर तसे बदलले नसल्यास त्याप्रमाणे रिपोटत कमिटीनें शेरा दिला पाहिजे. ५. कोणा सभासदाला भिन्नमतपत्रिका नोंदली जावी असे वाटत असेल त्याने मुख्य रिपोर्टवर सही करतांना आपण भिन्नमतपत्रिकेंतील मजकुराची