पान:सभाशास्त्र.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४९ कांहीं संस्थांचे सभा व संचालनाविषयक नियम Pooja Jadhav (चर्चा) ~ بی سی سی عمر میں میر محمدی حتمی منہ میں ترمیم کرنے سے حملہ میں معبے میں بیسیم (२) जर बिल मांडणाराने बिल निवडक कमिटीकडे सोंपवावे अशी सूचना मांडली असेल तर कोणाही सभासदाला सदरहू बिल लोकमताचे अंदाजासाठीं अमुक तारखेपर्यंत फिरते करावे अशी उपसूचना मांडतां येते. | (३) “फिरते करावे' अशी सूचना पास होऊन त्याप्रमाणे सदरहू बिलावर लें असेल तर बिल आणणाच्या सभासदाने त्याला बिल पुढे न्यावयाचे असेल तर सदरहू बिल निवडक कमिटीकडे सोपवावे अशी सूचना मांडली पाहिजे. मात्र अध्यक्षाने एतविषयक नियम तहकूब केला तर त्याचे परवानगीने सदरहू बिल विचारांत घ्यावे अशी सूचना मांडतां येईल. (८२) १. विल विचारांत घेण्याची अगर ते पास करण्याची सूचना बिल आणणाच्या सभासदालाच आणतां येते. निवडक कमिटीची सूचना अगर फिरते करावें अगर पुनः फिरतें करावें ही सूचना बिल आणणाच्या सभासदालाच करता येते. मात्र अन्य सभासदांना बिल आणणाच्या सभासदानें सूचना केल्यास उपसूचना म्हणून अन्य सभासदांना निवडक कमिटीची अगर फिरतें अगर पुनः फिरते करावें ही उपसूचना म्हणून आणतां येईल, २. बिल आणणारा सभासद म्हणजे जो प्रत्यक्ष ते आणतो तो व सरकारी बिलाबाबत ज्याकडे ते सोंपविले असेल त सभासद, व दुस-या मंडळांतून बिल पास होऊन सभागृहाकडे आलें असेल तर ते विचारांत घ्यावे अशी नोटीस देतो तो सभासद् होय. निवडक कमिटी (८३) १. विषयाशी संबंध असलेला सरकारी सभासद, बिल मांडणारा सभासद व कायदेमंत्रि जर तो सभासद असेल तर, हे तिघे प्रत्येक निवडक कमिटीचे सभासद असतील; व यांची नांवें निवडक कमिटी नेमणाच्या सूचनेत असलीच पाहिजेत असे नाही. ।। २. निवडक कमिटीचे अन्य सभासद, सूचनेचे अगर उपसूचनेचे वेळी सभागृह नेमील. जर कायदेमंत्रि सभासद नसेल तर उपाध्यक्ष अगर एका सभापतीची नेमणूक त्या कमिटीवर केली पाहिजे. ३. कायदेमंत्रि अगर उपाध्यक्ष अगर सभापति जो सामितींत असेल तो, अंगर दोन सभापति सभासद असल्यास ज्याचे नांव सभापतिमंडळांत पहिले