पान:सभाशास्त्र.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २४८ - ~- ठेवले जाणार नाहीत, व ठेवले असल्यास त्या बावी चर्चा न करता वगळून पुढील बाबी घेतल्या जातील. ( ७८ ) बिल मांडण्याच्या परवानगी-सूचनेस विरोध झाल्यास अध्यक्षाने वाटल्यास विल आणणाच्या सभासदाला व त्याला विरोध करणाच्या सभासदाला थोडक्यांत खुलासा करण्यास संधि द्यावी व नंतर अधिक चर्चा होऊ न देतां प्रश्न मतास घालावा ( प्रश्न–‘बिल मांडण्यास परवानगी द्यावी “That leave be granted to introduce the Bill.') ( ७९ ) बिल मांडल्यानंतर शक्य तितक्या लवकर पूर्वीच प्रसिद्ध झालें नसल्यास तें सरकारी गॅझेटांत प्रसिद्ध केले जाईल. ( ८० ) १. बिल मांडल्यानंतर अगर दुसन्या वेळी बिल मांडणाच्या समासदाला सदरहू बिलाबाबत खालीलपैकी एक सूचना आणता येते. (१) सभागृहाने सदरहू बिल ताबडतोब अगर अमुक दिवशी विचारांत घ्यावे. (२) सदरहू बिल निवडक कमिटीकडे सोपवावे. (३) सदरहू बिल लोकमत अजमाविण्यासाठी फिरते करावें. (Circulated) मात्र यांतील कोणतीही सूचना करण्यापूर्वी तीन दिवस आधी सर्व सभासदांना विलाच्या प्रति मिळाल्या पाहिजेत, प्रति मिळाल्या नसल्यास कोणाही सभासदाला सूचनेविरुद्ध आक्षेप घेता येईल व अध्यक्षाने आपले अधिकारांत एतद्विषयक नियम तहकूब न केल्यास आक्षेप योग्य ठरून सूचना मांडली जाणार नाहीं. २. निवडक कमिटीकडे विल सोपवावें ही सूचना ज्या वेळी करता येते त्याच वेळी सदरहू बिल दोन्ही मंडळांच्या संयुक्त कमिटीकडे सोपवावे अशी सूचना करता येते. | (८१) १. व्या दिवशी वर सांगितलेली कोणतीही सूचना सभेत मांडली जाईल त्या दिवशीं अगर त्यानंतर ज्या दिवशी तिजवर चर्चा होईल त्या त्या वेळीं बिलांतील सर्वसामान्य तत्त्वावरच वादविवाद होईल. बिलांतील तपशिलाबाबत वादविवाद होणार नाहीं. २. बिलाचे या अवस्थेत कोठलीही उपसूचना मांडता येणार नाही; मात्र(१) जर बिल मांडणाराने बिल विचारात घ्यावे अशी सूचना मांडली असेल तर कोणाही सभासदाला सदरहू विल निवडक कमिटीकडे सोपवावें अगर लोकमताचे अंदाजासाठी फिरते करावे अशी उपसूचना मांडतां येईल.