पान:सभाशास्त्र.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २४६ ރ.ޅގތވރކޅގތވރކޅގތރނހރ (६७) १. कामकाजाचे कायद्यासंबंधींचे सर्व प्रश्न अगर आक्षेप यांचा निर्णय अध्यक्ष करील व तो अखेरचा राहील. | २. असला आक्षेप वाटेल तेव्हां सभासदाला घेता येईल मात्र तो घेतांना फक्त तो काय आहे एवढ्यापुरतेच त्याचे भाषण मर्यादित असले पाहिजे. (६८) असंबद्ध गोष्टी, पुनरुक्ति अगर चर्वितचर्वण एखाद्या सभासदाचे भाषणांत होत आहे असे अध्यक्षास वाटल्यास त्याने ही गोष्ट सभागृहाचे नजरेस आणून सदरहू सभासदास भाषण बंद करण्यास सांगावे. (६९) १. सभागृहांत व्यवस्था ठेवण्याचे काम अध्यक्षाचे आहे व तत्संबंधींचे निर्णय अमलात आणण्यासाठी जरूर ते सर्व अधिकार त्याला आहेत. २. अव्यस्थित वागणाच्या सभासदाला बाहेर जा’ सांगण्याचा अधिकार त्याला आहे व त्याप्रमाणे ज्या सभासदाला तो आज्ञापील त्याने ताबडतोब सभागृह सोडले पाहिजे व त्या दिवसाचे बैठकीस गैरहजर राहिले पाहिजे. दुसरे वेळी एकाच अधिवेशनांत याप्रमाणे एखाद्या सभासदाला अध्यक्षाने बाहेर जाण्यास सांगितले असेल तर सदरहू अधिवेशनाचे राहिलेल्या कालातील सर्व वैठकस गैरहजर राहावे अशीही आज्ञा अध्यक्ष देईल व ती तशी दिल्यास सदरहू सभासदाने गैरहजर राहिले पाहिजे. ३, सभागृहांत गंभीर स्वरुपाची अव्यवस्था माजल्यास अध्यक्ष काही काळ बैठक तहकूब करील, ४. नियम ६७, ६८, ६९ यांत दिलेले अधिकार असले तरी अध्यक्षास आपल्या अधिकाराचा उपयोग करून दिलाबाबत सूचना मांडण्यास, त्यावर चर्चा होण्यास बंदी अगर विलंब करता येणार नाही. तसेच प्रश्न मतास घालण्याचे नाकारता येणार नाहीं अगर ते करण्यांत विलंब करता येणार नाही. नियमांनी स्पष्टपणे या बाबतींत अधिकार दिले असतील तरच बिलाबाबतचा सूचना अगर प्रश्न त्याला बंद करता येईल अगर त्यास विलंब करता येईल, (७१) सभागृहांतील (१) प्रेक्षक, (२) वृत्तपत्रकार, (३) सरकारी अधिकारी यांसाठी असलेल्या जागांत (गॅलरीत) बसण्याची व्यवस्था अध्यक्ष नियम करून ठरवील. या नियमांना गव्हर्नर-जनरलची सम्मति असली पाहिजे, (७२) योग्य वाटेल त्या वेळीं अध्यक्ष प्रेक्षक व वृत्तपत्रकार यांना समागृहाबाहेर जाण्यास सांगेल,