पान:सभाशास्त्र.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ सभाशास्त्र जेथे समान मते पडतील तेथे अध्यक्षाला जादा मताचा अधिकार आहे व त्याने तो वापरलाच पाहिजे, मत आवाजावरून अगर कोणी सभासदाने विभागणीची मागणी केल्यास विभागणी करून घेतले पाहिजे. विभागणीची ( Division ) पद्धत अध्यक्ष ठरवील, विभागणीचा निकाल अध्यक्ष जाहीर करील व तो अखेरचा समजला पाहिजे. (६३) त्याच. अधिवेशांत निर्णय झालेल्या बाबींबद्दल पुनः सूचना आणता येणार नाही, अध्यक्षाने अन्यथा न आज्ञापिल्यासः-- १. बिल विचारांत घ्यावें अगर निवडक कमिटीकडे सोपवावे अशी सूचना पूर्वी आली असतां ते लोकमतासाठी फिरतीवर घालावे अशी उपसूचना पास होऊन ते पुनः सभेपुढे त्याच अधिवेशनांत आले असतां पुनः ते विचारांत घ्यावें अगर निवडक कमिटीकडे धाडावे, अशी सूचना आणतां येईल. २. जे विल पुनः फिरतीवर धाडले असेल अगर पुनः निवडक कमिटीकडे धाडलें असेल व ते त्याच अधिवेशनांत परत आले असेल तर ते दुरुस्त करावे अशी सूचना करता येईल. ३. दोन्ही मंडळांतील सभासदांत झालेला मतभेद दूर करण्यासाठी भरलेल्या सभासदांचे बैठकीत जे ठरले असेल त्याला अनुसरून सूचना देता येईल, ४. गव्हर्नर जनरलच्या फेरविचारार्थ धाडलेल्या बिलाला दुरुस्तीसूचना आणता येईल, ५. बिलांत आनुषंगिक अगर शाब्दिक अशी दुरुस्ती करणारी सूचना आणतां येईल. ६. अमुक मुदतीत नियमाने एखादी सूचना केलीच पाहिजे अगर करावी असे असेल तर तशी सूचना आणता येईल. (६४) १. सूचना मांडणाराचे भाषणानंतर अध्यक्ष ज्या क्रमाने व ज्यास पाचारील त्याने बोलावें. पाचारल्यानंतर सभासद न बोलला तर त्या सूचनेवर अध्यक्षाने परवानगी दिल्याशिवाय त्याला बोलण्याचा अधिकार नाहीं. २. उत्तरादाखल अगर अन्यथा नियमाने अधिकार असेल तर एका सूचनेवर सभासदाला एकापेक्षा अधिक वेळां बोलता येईल. अन्यथा सभासदाला