पान:सभाशास्त्र.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४३ कांहीं संस्थांचे सभा व संचालनावषयक नियम असल्यास आपल्या जागी उभे राहून व अध्यक्षाला उद्देशून बोलले पाहिजे. अध्यक्ष उभा राहताच बोलणाच्या सभासदाने बसले पाहिजे. (५८) चर्चा चालू असतां खुलासा व्हावा म्हणून अगर अन्य कांहीं पुरेशा कारणाकरता एखाद्या सभासदाला चर्चित विषयासंबंधी दुसन्या सभासदाला कांहीं प्रश्न विचारावयाचा असेल तर, तो अध्यक्षामार्फत विचारला पाहिजे, (५९) सभेचे कामकाज इंग्रजी भाषेत चालेल, इंग्रजीशी ओळख नसणाच्या सभासदांस अध्यक्ष देशी भाषेत बोलण्यास परवानगी देईल. | (६०) नियमांत सांगितलेल्या मर्यादांना धरून सभेमध्ये भाषणस्वातंत्र्य आहे. सभेतील भाषणाबद्दल अगर दिलेल्या मताबद्दल अगर सभेतील वृत्तांताच्या सरकारी प्रकाशनांतील कांहींही उल्लेखाबद्दल कोणाही सभासदाविरुद्ध कोठल्याही कोर्टात कांहीही इलाज करता येणार नाहीत, (६१) १. सभेपुढील विषयाला धरून भाषण असले पाहिजे. २. भाषणांत सभासदानें-- (१) न्यायालयप्रविष्ट गोष्टींचा उल्लेख करूं नये. (२) अन्य सभासदांविरुद्ध व्यक्तिगत आरोप करू नये, ) हिंदी विधिमंडळ अगर प्रांतिक विधिमंडळाबाबत अपमानकारक भाषा वापरू नये. (४) बादशहा, गव्हर्नर जनरल अगर गव्हर्नर यांच्या वर्तनांवर कमीपणा आणण्यासारखे बोलू नये. (पण त्यांच्या कारभाराबाबत बोलण्यास हरकत नाहीं.) तसेच न्यायदानासंबंधांत कोटांचे वर्तनावर कमीपणा आणणारा उल्लेख करू नये. | (५ ) सरकारद्रोही, राज्यद्रोही, बदनामीकारक असे शब्द आणू नयेत. (६) जाणूनबुजून व सारखा अडथळा सभाकायत उत्पन्न करण्यासाठी भाषणाचा हक्क वापरू नये. | (६२) सभागृहाचा निर्णय ज्यांत हवा आहे अशी बाब सभासदानें सूचनेने मांडली पाहिजे; व त्यावर प्रश्न विचारून अध्यक्षानें तो घडवून आणला पाहिजे, । सर्व प्रश्नांचा निर्णय हा अध्यक्षाव्यतिरिक्त सभासदांचे बहुमताने होईल.