पान:सभाशास्त्र.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २४ ० ނއރވލއލމށފހރތކރވނތތރއގހރރރރރ ... މހރއގދތރގއވމފދތރތކރމ.. पहिली बाब राहील. दुसरे कोणतेही कामकाज होण्यापूर्वी त्या यादीतील प्रश्न विचारले जातील. अध्यक्षाने प्रश्न मंजूर केल्यानंतर सदरहू प्रश्न मंजूर केला आहे अशी नोटीस चिटणीस योग्य त्या सरकारी सभासदाला देईल. पांच दिवसांनंतरच्या कोणत्याही दिवशीं सदरहू प्रश्न उत्तरासाठी यादींत ठेवता येईल. सरकारी सभासदाची संमत असेल तर पांच दिवसांपूर्वीच्या दिवसाचे यादींत तो ठेवता येईल, एका सभासदाला एके दिवशी पांचांपेक्षा अधिक प्रश्न विचारण्यासाठी अध्यक्ष पाचारण करणार नाहीं. (४१) कोणत्या दिवशी कोणत्या खात्याबाबत प्रश्न विचारावयाचे हे अध्यक्ष वेळोवेळी ठरवील व नेमलेल्या दिवशी त्या त्या खात्याचे संबंधांत जे प्रश्न असतील तेच विचारले जातील, सरकारी सभासदांची संमत असेल तर अध्यक्ष त्यांत बदल करील. बिगरसरकारी सभासदांना उद्देशून विचारलेले प्रश्नांबाबतही अध्यक्ष दिवस ठरवील व त्या दिवशीच ते विचारले जातील. (४२) प्रश्नासाठी दिलेल्या वेळांत त्या दिवसाच्या यादीतील प्रश्न विचारून संपले नाहीत तर, राहिलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरें ज्या सभासदाला उद्देशून प्रश्न विचारले असतील त्याने सभागृहाचे टेबलावर ठेवावीत. सदरहू प्रश्नांना तोंडी उत्तरे दिली जाणार नाहीत व त्याबाबत उपप्रश्नही विचारतां येणार नाहींत. तथापि ज्या दिवसाचे यादींत प्रश्न असेल त्या दिवसाचे सभेचे आधी नोटीस देऊन, सभासद तो परत घेऊ शकतो; तसेच एखादा प्रश्न त्या दिवशीं न ठेवता पुढे अमुक दिवशी ठेवावा असे नोटिशीत नमूद केले असेल तर, त्या दिवशीं अन्य रीतीनें तो नियमबाह्य नसल्यास, त्या दिवसाच्या यादीतील प्रश्नानंतर ठेवला जाईल. मात्र नोटीस देऊन पुढे ढकललेला प्रश्न, नोटीस दिल्यापासून दोन दिवसांनंतरच्या यादीत येईल. (४३) अध्यक्ष आपल्या मर्जीत सांगतील त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील व उत्तरे दिली जातील. (४४) प्रश्नास पाचारण केले असतां विचारला नाहीं अगर विचारणारा सभासद गैरहजर असेल तर, दुसन्या सभासदानें विनंति केल्यास अध्यक्ष सदरहू प्रश्नाचे उत्तर, त्याला वाटल्यास देण्यास सांगेल. (४५) उत्तरांतील माहिती अगर वस्तुस्थिति अधिक स्पष्ट होण्यासाठी कोणाही सभासदाने उपप्रश्न विचारावेत. मात्र प्रश्नांच्या विषयासंबंधीच्या