पान:सभाशास्त्र.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४१ कांहीं संस्थांचे सभा व संचालनावषयक नियम मर्यादा अगर नियम यांचे उल्लंघन होत असेल तर अध्यक्षाने सदरहू उपप्रश्न नामंजूर केले पाहिजेत. (४६) विचारलेला प्रश्न अगर त्यावर दिलेले उत्तर यावर चर्चा होऊ दिली जाणार नाहीं, विचारार्थ तहकुबीच्या सूचना (४७) निश्चित व निकडीची सार्वजनिक महत्त्वाची बाब विचारांत घ्यावी म्हणून सभातहकुबीची सूचना गव्हर्नर-जनरलने बंदी न केल्यास अध्यक्षाचे संमतीने मांडतां येईल. (४८) सदरहु सूचनेबाबत खाली दिलेल्या मर्यादांचे पालन झाले पाहिजे, १. एका दिवशी एकच सूचना मांडतां येईल, २. एका सूचनेत एकाच बाबीचा विचार करता येईल व तीही बाब निश्चत असून ताज्या घडामोडीशी तिचा संबंध असला पाहिजे. १३. ज्यावर त्याच अधिवेशनांत चर्चा झाली असेल अशा विषयासंबंधीं पुनः चर्चा सदरहू सूचनेने होता कामा नये. ४. पूर्वीच विचारार्थ मांडण्याचे निश्चित झाले असून सभेपुढे येणारी अशी कोणतीही बाब या सूचनेत असू नये. तसेच ज्या बाबीचा विचार व्हावा म्हणून सूचनेची नोटीस दिली गेली असेल अशीही बाब या सूचनेत असू नये, ५. ज्या विषयासंबंधी ठराव आणतां येणार नाहीं अगर गव्हर्नरजनरलच्या सम्मतीशिवाय तो आणता येणार नाही, अशा विषयासंबंधीची बाब सदरहू सूचनेत नसावी. (४९) प्रश्नोत्तरें संपतांच व अन्य काम सुरू होण्यापूर्वी ही सूचना मांडण्याची परवानगी मागितली पाहिजे, | (५० ) या तहकुबीच्या सूचनेची नोटीस ज्या दिवशी ती सूचना मांडावयाची आहे त्या दिवसाचे सभेचे सुरवातीपूर्वी खालील इसमांना दिली पाहिजे. १. अध्यक्ष २. ज्या खात्याचा संबंध येत असेल त्याचा प्रमुख सरकारी सभासद ३. चिटणीस. स... १६