पान:सभाशास्त्र.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३९ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम (३७) १. सरकारी सभासदाला विचारलेला प्रश्न सार्वजनिक बाबीबाबत आधकारी या नात्याने जो संबंध विषयाशीं आला असेल त्याला, अगर ज्या राज्यकारभाराचे बाबतींत तो जबाबदार आहे, त्याला धरून असला पाहिजे. २. बिगरसरकारी सभासदाला विचारलेला प्रश्न त्याने आणलेल्या बिलावद्दल, ठरावाबद्दल अगर विधिमंडळातील ज्या कामाबद्दल तो जबाबदार आहे, त्याला धरून असला पाहिजे. (३८) खालील शबरहुकूम असेल तर प्रश्न मंजूर होईलः-- | १. प्रश्न स्पष्ट होण्याला आवश्यक नसलेला नामनिर्देश अगर विधान त्यांत नसले पाहिजे. ' २. प्रश्नांत जर पृच्छकाने स्वतः एखादे विधान केले असेल तर त्याचे यथार्थतेबद्दल तो जबाबादार धरला जाईल. ३. प्रश्नांत विचारक ( Argument ) अनुमान, व्यंजना, अगर बदनामीकारक मजकूर असता कामा नये. ४. प्रश्नांत मतप्रदर्शनाची मागणी नसावी अथवा त्यांत एखादी परिस्थिति गृहित धरून त्यावरील उपायांची पृच्छा नसावी. (उ० धरणीकंप झाला तर सरकारने काय करण्याचे ठरविले आहे ? ) ५. सरकारी अधिकारी या नात्यानें अगर सार्वजनिक व्यक्ति या नात्याने जें वर्तन झाले असेल त्याव्यतिरिक्त वर्तनाबाबत अगर शीलाबाबत प्रश्नांत उल्लेख नसावा. ६. प्रश्न आटोपशीर असावा. (३९ ) नियमांप्रमाणे प्रश्न मंजूर करण्यालायक आहे की नाही हे अध्यक्ष ठरवील. जर प्रश्न विचारण्याचे हक्काचा दुरुपयोग झाला आहे अगर प्रश्नाने सभाकायत व्यत्यय येणार आहे अगर त्यांत न्यूनता उत्पन्न होणार आहे। अगर तो नियमांविरुद्ध आहे, असे अध्यक्षास वाटल्यास तो नामंजर करील. जर विषयासंबंधींच्या नियमांविरुद्ध तो असेल तर त्याने तो नामंजूर केलाच पाहिजे, (४० ) मंजूर केलेले प्रश्न यादीत ठेवले जातील. प्रश्नाला दिलेल्या वेळांत यादींतील क्रमानुसार ते विचारण्याबद्दल पाचारण केले जाईल. त्या त्या दिवसांसाठी केलेली प्रश्नांची यादी त्या त्या दिवसांचे कार्यक्रमपत्रिकेतील