पान:सभाशास्त्र.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३७ कांहीं संस्थांचे सभा व संचालनावषयक नियम

(२५) बिगरसरकारी ठरावाचे दिवशींचा कार्यक्रम चिटणीस बॅलटने आलेल्या ठरावांचा क्रम काढून अध्यक्षाचे अनुमतीने ठरवील. (२६) प्रत्येक दिवसाची कार्यक्रमपलिका चिटणीस तयार करील व तिचे एक एक प्रत प्रत्येक सभासदाला दिली जाईल. कार्यक्रमांत नसलेली बाब अध्यक्षाने परवानगी दिल्याशिवाय सभेपुढे येणार नाही. कार्यक्रमांत नसलेली, पण नियमान्वये आणता येईल, अशी बाब सभेपुढे येऊ शकेल ( उ० विचारार्थ तहकुबीची सूचना.) नोटिशीची आवश्यकता नियमाप्रमाणे जेव्हां असेल तेव्हा ती बाब नोटीस दिली असल्याशिवाय कार्यक्रमपत्रिकेंत येणार नाहीं व नोटिशीची मुदत संपते त्यानंतरच्या दिवसांतील कार्यक्रमांत ती घालता येईल. | ज्यावर चर्चा चालू आहे तो ठराव सोडून पांच ठरावांपेक्षा जास्त ठराव बिगरसरकारी ठरावाचे दिवशी चिटणिसाने कार्यक्रमपलिकेत ठेवू नयेत. अध्यक्षानें खास आज्ञा केल्यास अधिक ठेवावेत. (२७) बिगरसरकारी कामकाजाचे दिवशीं कार्यक्रमपालकेंतील ज्या बाबी राहातील त्या पुनः तसल्याच दुस-या बिगरसरकारी कामकाजाचे दिवशीं आपोआप चर्चेसाठी येणार नाहीत. त्या दिवसासाठी बॅलट करून जो क्रम लागला असेल त्या क्रमाप्रमाणे कार्यक्रमपत्रिका तयार होईल. मात्र त्यांत प्रथमस्थान ज्या बाबीवरील चर्चा चालू असेल तिला मिळेल. | (२८) नियमाप्रमाणे द्यावयाची प्रत्येक नोटीस कचेरीचे दिवशी ११ ते ३ ( दुपारचे ) या कालांत नोटीस कचेरीत सभासदाने लेखी व सहीनिशीं दिली पाहिजे. नोटीस चिटणिसाला दिली पाहिजे. वेळेनंतर आलेली नोटीस दुसरे दिवशीं आली असे मानले जाईल. | (२९) अधिवेशन संपताच सर्व नोटिसा रद्द होतात. बिल मांडण्याचे. परवानगीबाबत दिलेली नोटीस माल बाद होत नाहीं. ( ३० ) नियमांप्रमाणे जी नोटीस सर्व सभासदांना मिळावयास पाहिजे त्या नोटिशीची एक प्रत चिटणीस प्रत्येक सभासभादाला धाडील, त्याचप्रमाणे जे कागदपल प्रत्येक सभासदाला मिळाले पाहिजेत असा नियम असेल ते कागदपत चिटणीस प्रत्येक सभासदाकडे धाडील, अध्यक्ष नियम करून जे ठरवील त्या पद्धतीने कागदपत्र व प्रति सभासदांकडे चिटणीस धाडील. (३१) सभेचे सुरवातीचा पहिला तास प्रश्नोत्तरांसाठी ठेवला जाईल.