पान:सभाशास्त्र.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २३६ ( १८ ) उपाध्यक्ष व सभापति यांना सभेमध्ये अध्यक्षस्थानी असतां अध्यक्षाचे सर्व अधिकार असतात. (१९) विधिमंडळाचा चिटणीस व अन्य अधिकारी गवर्नर जनरल नेमील व ते गव्हर्नर जनरलची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहतील, | चिटाणसाने अध्यक्षाचे नियंत्रणाखाली विधिमंडळाचे कचेरीची व्यवस्था ठेवायची आहे. सभा व कार्यक्रम (२०) अध्यक्षाचा अन्यथा हुकूम नसेल तर विधिमंडळाची सभा सकाळी ११ वाजता सुरू होईल. (२१) विधिमंडळाची सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे. (२२) कामाची परिस्थिति पाहून नव्हर्नर जनरल बिगरसरकारी कामाला दिवस नेमून देईल, विषयांचे वर्गवारीप्रमाणे या दिवसांत वांटणी केली जाईल. ज्या विषयाला जो दिवस दिला असेल त्या दिवशी त्या विषयाची चर्चा प्रथम होईल. या नेमून दिलेल्या दिवसाव्यतिरिक्त दिवशी फक्त सरकारी कामकाज चालेल, तथापि गव्हर्नर जनरलने सम्मति दिल्यास या सरकारी कामकाजाचे दिवशीं बिगरसरकारी कामकाज घेतां येयेल. (२३) सरकारी कामकाजाचे दिवशीं, सरकार सांगेल त्याप्रमाणे चिटणिसाने कार्यक्रमपत्रिका तयार करावी. (२४) बिगरसरकारी कामाचा क्रम नियमाप्रमाणे चिठ्या टाकून (Ballat ) चिटणिसाने १५ दिवस आधी अध्यक्षाचे अनुमतीने ठरवावा व त्याप्रमाणे कार्यक्रमपत्रिका तयार करावी, बिगरसरकारी बिलाचे दिवशीं प्रथम ज्या बिलावर निवडक कमिटी नेमली असेल व जिचा रिपोर्ट सभागृहाला हजर करावयाचा असेल, ते बिल ठेवले जाईल. त्यानंतर या सभागृहाने पास करून वरिष्ठ कौन्सिलांतून पास होऊन आलेले बिल ठेवले जाईल. त्यानंतर वरिष्ठ कौंसिलांत पास झालेले बिल या सभागृहाचे अनुमतीसाठी आलेले ठेवले जाईल. त्यानंतर ज्या बिलावर दोन्ही मंडळांतील सभासदांची संयुक्त कमिटी नेमली असेल व जिचा रिपोर्ट सादर केलेला असेल, ते बिल ठेवले जाईल. नंतर लोकमतार्थ फिरतीवर धाडलेला बिलें ठेवली जातील; व शेवटीं अन्य, बिले ठेवण्यांत येतील. एकाच क्रमांकांत बसणाच्या बिलांपैकी प्रथम कोणते, नंतर कोणते हे बॅलटने ठरविले जाईल.