पान:सभाशास्त्र.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*०*००० २३५ २३५ कांहीं संस्थांचे सभा व संचालनावषयक नियम १२:५३, २९ मार्च २०१८ (IST)~~ वाराला अन्य सर्व उमेदवारांचे मतांचे बेरजेपेक्षा अधिक मते मिळतील त्या वेळीं तो निवडून येईल; तोंपर्यंत प्रत्येक मोजणींत सर्वांत कमी मते मिळणारा उमेदवार बाद करीत जावा. जेव्हां सारखी मते असतील व कोणाला बाद करावं हे ठरविणे अशक्य होईल, तेव्हां चिठ्या टाकून कोणाला बाद करावे हैं रवावें. | निवडून आलेल्या सभासदांची निवड शहर्नर जनरलने मान्य न केल्यास पुनः निवडणूक होईल, मात्र सदरहू विधिमंडळ असेपर्यंत त्या सभासदाला पुनः अध्यक्षपदासाठी उभे राहाता येणार नाहीं. (१५) उपाध्यक्ष विधिमंडळाने निवडावा. त्याचे निवडणुकीस गव्हर्नर जनरलची मान्यता पाहिजे. (१६) प्रत्येक विधिमंडळाने सुरवातीस शपथविधीनंतर उपाध्यक्ष, निवडावा. काम करण्यास तयार असलेल्या कोणाही सभासदाचे नांव दुस-या सभासदाने सुचवून, आणखी एका सभासदाचे अनुमोदन घेऊन, सूचनापत्र अध्यक्षाकडे द्यावे. अध्यक्षाने उमेदवारांची नांवें, सूचक, अनुमोदक यांचीं नांवे, निवडणुकीचे सभेत वाचून दाखवावत. एकच उमेदवार असल्यास त्याची निवड जाहीर करावी. अनेक असल्यास गुप्त मतदानपद्धतीने निवडणूक करण्यास सांगावें. ज्याला सर्वात अधिक मते मिळतील तो निवडून आला असे अध्यक्षाने जाहीर करावे. | या निवडणुकीस गव्हर्नर जनरलने मान्यता न दिल्यास पुनः निवडणूक करावी, माल पुनः होणारे निवडणुकीस सदरहू सभासदाला उभे राहातां येणार नाहीं. | (१७) प्रत्येक अधिवेशनाचे सुरवातीस अध्यक्षाने चारापर्यंत सभापतींचे मंडळ (Pannel of Chairmen) सभासदांतून नेमावे, या मंडळापैकी एकानें अध्यक्षाचे व उपाध्यक्षाचे गैरहजेरीत अध्यक्ष अगर उपाध्यक्ष सांगेल तेव्हां सभापतित्व स्वीकारून सभा चालवावी. जेव्हां अध्यक्षपद रिकामे असेल व सभापतित्वाचा अधिकार कोणालाही नसेल त्या वेळी गव्हर्नर जनरलने सभासदांपैकी एकाला अध्यक्ष निवडून मान्य होईपर्यंत सभापति नेमावे, हा सभापति सभापति-मंडळ नेमले जाईपर्यंत राहातो.