पान:सभाशास्त्र.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २३४

_*_*_*__*_

| (११) गव्हर्नर जनरलकडे राजीनामा धाडून सभासदत्व सोडतां येते. तो मान्य झाला म्हणजे जागा खाली होते. (१२) लागोपाठ दोन महिने सभासद आपले कर्तव्य हजर राहून करूं शकला नाहीं अगर हिंदुस्थानाबाहेर राहिला तर, गव्हर्नर जनरलला सदरहू सभासदाची जागा खाली झाली असे जाहीर करता येते, अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे (१३) विधिमंडळाचा अध्यक्ष विधिमंडळाने निवडावा, मात्र झालेली निवड गव्हर्नर जनरलने मान्य केल्यास ती विधियुक्त ठरते. | (१४) जेव्हां केव्हां अध्यक्षाची जागा रिकामी पडेल त्या वेळी ती भरण्यासाठी होणा-या निवडणुकीची तारीख प्रत्येक सभासदाला चिटणीस नोटिशीनें कळवील, निवडणुकीचे आधल्या दिवशींचे सकाळचे १२ पूर्वी कोणाही सभासदाला दुस-या सभासदाचे नांव अध्यक्षपदासाठी सुचविता येईल. सूचकाने सूचनापल्लावर सूचक म्हणून स्वतःची सही करून आणखी एका सभासदाची अनुमोदनादाखल सही घेऊन ते चिटणिसाकडे दिले पाहिजे. सूचनापत्रांत अध्यक्षपदासाठी सुचविलेल्या सभासदाचे नांव व निवडून आल्यास काम करण्याची तयारी असल्याबद्दल सूचकानें खात्री करून घेतली आहे असे आश्वासन त्यांत असले पाहिजे. अध्यक्षपदासाठी उभा असलेला सभासद्, त्याचप्रमाणे त्याचा सूचक व अनुमोदक, हे सर्व सभासद राजनिष्ठेची शपथ अगर प्रतिज्ञा घेतलेले असले पाहिजेत, अन्यथा, सूचनापत्र रद्दबातल ठरते. | निवडणुकीचे सभेत जो मावळता अध्यक्ष, अगर उपाध्यक्ष असेल अगर तात्पुरता सभापति नेमलेला असेल, त्याने उमेदवारांची नांवें, सूचक, अनुमोदक, यांच्या नांवांसह वाचून दाखवावी; एकच उमेदवार असल्यास त्याचा निवड जाहीर करावी; अनेक असल्यास गुप्त मतदानपद्धतीने निवडणूक करण्यास सांगावें. जेव्हां दोहोंपेक्षा अधिक उमेदवार असतील आणि पहिल्या मोजणींत कोणा एकाही उमेदवाराला अन्य सवांना मिळालेल्या मतांचे बेरजेपेक्षा अधिक मते मिळाली नसतील तर, सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद करून राहिलेल्या उमेदवारांत निवडणूक करण्यास सांगावें. ज्या वेळी एका उमेद