पान:सभाशास्त्र.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २३० चालावा, म्हणून समाज अस्तित्वात आला. एकमेकांचे ऐकून घेणे, सहिष्णुता दाखविणे, समजुतीने घेणे, ही प्रवृत्ति समाजाच्या मुळाशी आहे, तो त्याचा स्थायीभाव आहे. तसे नसेल तर मनगटाचे जोरावर वाटेल त्याने वाटेल त्यापासून घ्यावे व त्याच जोरावर ते टिकवावे ही जंगलचा कायदा प्रसृत होऊन समाज ही संस्था नामशेष होईल. समाज म्हणजे सर्वमान्य नियंत्रण व त्या नियंत्रणाला निष्ठापूर्वक मानण्याची प्रवृत्त. समाजाचे हें नियंत्रण जेवढे वस्तुस्थितीत सर्वमान्यता पावेल तेवढे ते अधिक प्रभावी ठरते. समाजनियंत्रणांत प्रत्येकाला आपला अनुभव सांगतां आला पाहिजे. आपला अभिप्राय व्यक्त करण्याची योग्य संधि मिळाली पाहिजे. म्हणजेच प्रत्येक निर्णय विचारविनिमय होऊन झाला पाहिजे. प्रत्येकाला तो घडवून आणण्यांत आपण कांहीं भागीदार होता असे वाटले पाहिजे. हे जेथे शक्य होते, तेथे खरी लोकशाही नांदते. त्याच दृष्टीने समाजाव्यतिरिक्त जे संघ असतात, त्यांचा विचार केला पाहिजे. इच्छासिद्ध संघ असो अगर विधिसिद्ध असो; होणारा निर्णय, बंधनकारक निर्णय, सभासदांनी घेतला पाहिजे. म्हणून सभासदांना विचारविनिमयाला पूर्ण वाव मिळाला पाहिजे. भाषणस्वातंत्र्य व संघस्वातंत्र्य या दृष्टीने मौलिक स्वातंत्र्ये आहेत. नागरिकत्वाचा ते श्वासोच्छास आहेत. त्याविना नागरिकत्व हें मृतवत् आहे. संघविषयक व्यवहार आधुनिक कालांत राज्यव्यवस्थेत व अन्य विभागांत वाढत आहे. तो योग्य तन्हेने व्हावा म्हणून संघतंत्र व सभातंत्र यांचे ज्ञान असणे अवश्य आहे. विचारविनिमयात व्यवस्था असावी असे प्रत्येकाला वाटते. पण प्रत्येक जण नियमाप्रमाणे वागतोच असे नाही. कांहीं अज्ञानामुळे व कांहीं आडमुठेपणाने अयोग्य वागतात, विचारविनिमय अगर सभा में निर्णय घेण्याचे माध्यम आहे, निर्णय टाळण्याचे नाहीं; वाद वाढविण्याचे कार्य या माध्यमाचे नसून वादविवादांतून तत्त्वबोध घेऊन सत्य निर्णय घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. शत्रुत्व, द्वेष, मनोमालिन्य वाढविण्याचे दृष्टीने ते अस्तित्वात आलेले नसते व आणलेलेही नसते, तर सहविचार होऊन, समन्वय होऊन, सर्व सहवीर्य व्हावेत व सर्वांचे हितकर असे निर्णय त्यांतून निर्माण व्हावेत, ही अपेक्षा असते. बहुमत है जरी निर्णयाचा आधार असला तरी ते अल्पमतवाल्यांवर जुलमाचे साधन व्हावे अशा रीतीने सभात वापरले जाणें हें गैर आहे. बहुमताने निण • निर्णय झाला तरी तो सभेचा सामुदायिक निर्णय आहे अशी भावना व ती मान