पान:सभाशास्त्र.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२९ संघतंत्र वाटते. कोणतीही पद्धत असो, निवडणुकीबाबत प्रत्येक संघाचे नियम असणे जरूर आहे. वार्षिक साधारणसभेत मारामारी, गोंधळ, गडबड, निदान निवडणुकीचे बाबतीत तरी त्यायोगे टळेल. । कार्यकारी मंडळांतील सभासदांची संख्या, त्याची कार्यपद्धति, कार्यवाह, त्याचे अधिकार, कार्यकारीमंडळाचे अधिकार, सामान्य व विशिष्ट परिस्थितींतील, स्पष्टपणे नियमांत असावे. तसेच अध्यक्षाचे अधिकार किती, त्याचे गैरहजेरीत ते चालविण्याची व्यवस्था, कित्येक ठिकाणी उपाध्यक्ष निवडतात, ते किती व त्यांचा अधिकार हेही स्पष्ट असावे. संघाला खजिनदार व हिशोबतपासनीस असणे जरूर आहे. वरील सर्व बाबतींत योग्य ती व्यवस्था संस्थेचे घटनेत असली पाहिजे. सर्व मुख्य, मौलिक व संघटन स्वरुपाच्या गोष्टींचा समावेश ज्या नियमांत होतो त्यांना घटना असे म्हणणे योग्य आहे. कार्यपद्धतीबाबत अगर अन्यबाबतचे नियम हे तितके मूलगामी स्वरुपाचे नसतात. समाविषयक व सभासंचालनविषयक नियम प्रत्येक संघाला अगर संस्थेला असले पाहिजेत. साधारणसभा, असाधारणसभा, प्रार्थितसभा, यांची कामे, त्या भरविण्याबाबत निमंत्रण, नोटीस, प्रसिद्धी वगैरेचे नियम, सभेत ठेवावयाचे विषय, त्याबाबतचे नियम, सभासदांना काय माहिती मिळू शकेल याबाबतचे नियम, कार्यक्रमपत्रिकेची रचना, गणसंख्या, वगैरे सभाविषयक नियम असावेत. त्याचप्रमाणे चर्चेसंबंध, तहकुबीसंबंधीं, ठराव, उपसूचना मांडणे, अगर परत घेणे वगैरे संचालनविषयक नियम असावेत, तात्पर्य, उद्देशापासून सभासंचालनापर्यंत सर्व कार्यात व्यवस्था असावी म्हणून प्रत्येक संघाला घटना व नियम असणे जरूर आहे. व त्यांत काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत याचा थोडक्यांत विचार येथपर्यंत केला आहे. । प्रस्तुत ग्रंथ सभाशास्त्रासंबंधीचा आहे व संघ व सभा' यांचा संबंध लक्षात घेतां, अवश्य तेवढा व तोही थोडक्यांत संघतंत्राचा विचार केला आहे. सभाशास्त्राप्रमाणे संघटन में एक शास्त्र आहे. त्याचेही कांहीं सिद्धांत अनुभवाने निर्माण झालेले आहेत. त्या सर्वांचा परामर्ष घेणे येथे शक्य नाहीं व विषयमर्यादा ओलांडल्यासारखेही होईल. संघ व सभा हीं सुसंस्कृत समाजाची प्रमुख लक्षणे आहेत. किंबहुना समाज हा अग्रसंघ आहे, श्रेष्ठ संघ आहे. मात्र त्याचे सभासदत्व जन्मादारभ्य असून मृत्यूपर्यंत टिकते. मनुष्यामनुष्यांतील ‘यवहार केवळ शक्तीचे जोरावर न चालतां, विवेकावर, विचारविनिमयावर