पान:सभाशास्त्र.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २२८ ހހހހހހހހހހހހހހހހހހހ नवीन करू नये असे वातावरण उत्पन्न होते. तथापि कार्यकारीमंडळ हे निवडून द्यावे ही पद्धत अधिक चांगली आहे. कार्यकारीमंडळ निवडण्याची अगर अन्य निवडणुकी करण्याची पद्धत कोणती असावी हे घटनेत स्पष्ट असावे, व हा प्रश्न मौलिक स्वरुपाचा असलेमुळे वारंवार त्यांत बदल होणे अनिष्ट असते. जेथे एकच इसम निवडून द्यावयाचा आहे तेथे अडचण येत नाही. तसेच महामंडळाचे सभेत हजर असणा-यांची संख्या बेताने असते, तेथेही फारशी अडचण येत नाही. तथापि जेथे हजर सभासद पुष्कळ व जागाही पुष्कळ तेथे अनेक अडचणी असतात. सर्वसाधारणपणे निवडणुकी गुप्तमतदानपद्धतीने व्हाव्यात. जेथे अनेक जागा आहेत तेथे कशी मते द्यावीत हा महत्त्वाचा प्रश्न असतो. (१) जितक्या जागा तितकी मते, व सर्वच सर्व एका उमेदवारास एकवटून देता येण (Cumulative Voting ) ही एक पद्धत आहे. यांत अल्पसंख्याकाना संधि मिळते व पुष्कळ वेळां अधिक प्रतिनिधित्व मिळते, (२ ) जितक्या जागा तेवढी मते, मात्र एकापेक्षा अधिक कोणत्याही उमेदवाराला देतां येत नाहीत, तीं वांटून द्यावी लागतात; याला विभाजक मतदान (Distributive Votes ) म्हणतात. काही ठिकाणीं में विभाजन केलेच पाहिजे असे असल म्हणजे सर्व मते दिलीच पाहिजेत, या परिस्थितींत अल्पसंख्याकांना पुरेशी संधि मिळत नाहीं. ऐच्छिक विभाजन असेल तर अल्पसंख्याकांना योग्य संधि मिळते. (३) क्रमदेय मतदान (Proportional Representation ) है। आणखी एक पद्धत आहे. यांत पसंतीचा क्रम लावला जातो. मतदार, जा उमेदवार त्याला सर्वात पसंत असेल त्याला आपले पहिले मत देतो, व नंतर पसंतीच्या क्रमाने दुसरें, तिसरें, याप्रमाणे जेवढ्या जागा असतील तितक क्रमांक वाटल्यास देतो. किमान मते किती लागतात हे काढले जाते व ता ज्याला मिळतील तो निवडला जातो. त्याला जास्त मिळालेली मते पसंतीच्या क्रमानें राहेलेल्या उमेदवारांत वांटली जातात. या पद्धतींत मतदारांच्या विचारसरणीचे योग्य प्रतिनिधित्व निवडणुकीचे निकालांत उमटते. पण हा पद्धत फार क्लिष्ट, समजण्यास अवघड आहे. विधिमंडळांतील समित्यांच्या निवडणुकीत ही स्वीकारलेली आहे. कांहीं विश्वविद्यालयांच्या, संस्थांच्या, निवडणुकीतही तिला स्थान आहे. पण सर्वसामान्यरीत्या हिचा प्रसार या देशांत अद्याप झाला नाहीं. ऐच्छिक विभाजक मतदान हे त्यांतले त्यांत बर