पान:सभाशास्त्र.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२७ संघतंत्र އދއގއގއގތރވމފހރއގތރކޅކއވމފދތރނނކރވމފދތރގއހރނ"ރގއގހރތވރކ समतेचे वातावरण असणे उचित आहे. त्या दृष्टीने सर्व सभासद मताचे दृष्टीने सारखे असले पाहिजेत, एका सभासदाला एक मत हा मुख्य सिद्धांत आहे. नफ्यासाठी निघालेल्या संघांत भांडवलान्वये म्हणजे भागांच्या संख्येवर मतांची संख्या ठरविली जाते. सहकारी संस्थेच्या कार्यात एका सभासदाला एक मत हे मान्य केलेले आहे, व ते अगदी योग्य आहे. प्रतिनिधींनी संघटित झालेल्या संस्थांतून मताचे दृष्टीने सर्व प्रतिनिधी साररवे असतात. तथापि कित्येक संयुक्त संघांतून प्रतिनिधींचे मत हे त्याला निवडून देणाच्या संघाच्या सभासदांचे संख्येइतके मानले जाते. या पद्धतीला संख्याबंद मतपद्धत ( Block Votes ) म्हणतात. अधिकारपलांचा गळा देऊन अगर संख्याबंद मत देऊन निर्णय ठरविणे संघाचे कार्याचे दृष्टीने इष्ट असले तरी विचारविनिमयाचे तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे. जेथे भांडवलाचा प्रश्न नाहीं तेथे तरी एका सभासदाला एक मत असावे. तसेच सभासदत्वाचे नाना प्रकार शक्य तर नसावेत. पक्षबाजी न होण्यासाठी संघांत सर्व दृष्टींनी समानतेचे वातावरण असणे इष्ट असते. | संघाचे प्रभुत्व हे संघांतील सर्व सभासदांचे आहे. सर्व सभासदांचे मिळून होणारे जे संघटन ते त्या संस्थेचे महामंडळ होय. (General body ) या महामंडळाला संघाचे सर्व अधिकार असतात. संघाचे सर्व अखेरचे निर्णय या महामंडळाने सर्व सभासदांची सभा भरवून, त्यांत घ्यावयाचे असतात. सर्व सभासद दैनंदिन येऊन संघाचा व्यवहार पाहू शकत नाहीत, म्हणून प्रत्येक संस्थेचें अगर संघाचे एक कार्यकारीमंडळ असते व असे लहानसे मंडळ प्रत्येक संघांत असले पाहिजे. तसेच प्रत्येक संघाला प्रमुख असावा लागतो व तो महामंडळाने निवडून देणे योग्य आहे. कार्यकारीमंडळही महामंडळाने निवडून दिलेले असावे. कांहीं संस्थांतून संघप्रमुख निवडला जातो व तो कार्यकारीमंडळ नेमतो. यांत त्याच्या धोरणाला अनुकूल असे वातावरण निर्माण होते. पण कार्यकारीमंडळ त्याच्याशी समान भूमिकेवरून काम करू शकत नाहीं, तितकें निर्भीड असू शकत नाहीं व प्रतिनिधित्वाचे दृष्टीनेही न्यूनता असते. उलट कार्यकारीमंडळ, महामंडळाने निवडून दिलेले असल्यास, महामंडळांतील पक्षाचे प्रतिबिंब कार्यकारीमंडळांत पडते. व वर्षातून एकदोनदा होणारे वादावेवाद कार्यकारीमंडळाचे सभेत दररोज अगर साप्ताहिक होऊ लागतात. काम होण्याऐवजीं, कांहीं होऊ देऊ नये अगर कहीं